Political News P. Chidambaram's allegations against BJP Dainik Gomantak
गोवा

काँग्रेस पक्षच भाजपला खाली खेचू शकतो; पी. चिदंबरम

पी. चिदंबरम : शिरोड्यातील काँग्रेस सभेत तृणमूल, ‘आप’वरही निशाणा

दैनिक गोमन्तक

शिरोडा Political News : जाती धर्माच्या आधारावर राजकारण करून भाजप देशात फूट पाडत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपचा पराभव हे एकच ध्येय डोळ्यांसमोर ठेवा. बंगालचा तृणमूल (TMC) आणि दिल्लीचा ‘आप’ (AAP) भाजपचा (BJP) पराभव करू शकत नाही, तर फक्त काँग्रेस (Congress) पक्षच भाजपला खाली खेचू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांनी केले.

शिरोडा गट काँग्रेसने येथील पॅराडाईज सभागृहात आज आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत ते‌ बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी आमदार आलेक्स सिक्वेरा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख, ज्यो डायस, पक्षाचे निरीक्षक सुनील हनुमन्नवार, हेमंत सामंत, पंच सदस्य अँथोनी डिकॉस्टा, किस्तोद गुदिन्हो, बोरीच्या सरपंच ज्योती नाईक, शिरोडा गट काँग्रेसचे अध्यक्ष डिकॉस्टा, इच्छुक उमेदवार मुकेश नाईक, देविदास किन्नरकर हे व्यासपीठावर होते.

चिदंबरम‌ म्हणाले, की 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आलेल्यांनी घात केला. पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिक राहिले. यावेळी शंभर टक्के प्रामाणिक असलेल्यांनाच पक्षाची उमेदवारी दिली जाणार आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविणार आहे. यात पहिल्यांदा विविध खात्यांतील रिक्त जागा भरणार आहे. एस. सी., एस. टीं.ना नोकरीत राखीव जागा दिल्या जातील. नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्यांना राज्यातच नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

राज्यात महिला सुरक्षित नाहीत, त्यामुळे महिला पोलिसांची भरती केली जाईल. इन्फोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, आयटी यासाख्या क्षेत्रात जास्त नोकऱ्या उपलब्ध होतात. या सर्वांचे गोव्यात मोठे केंद्र उभारले जाणार आहे. गोवा सर्व क्षेत्रात पुढे आणण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करणार आहे, असेही ते म्‍हणाले.

‘काँग्रेसच्या राजवटीत सर्वाथाने विकास’

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, की काँग्रेस पक्षाच्या राजवटीत राज्याचा सर्वार्थाने विकास झाला होता. आजच्या सरकारने गोमंतकीयांची फसवणूक करण्याचेच काम केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कितीही महागाई झाली तरी पेट्रोलचा दर ६० रु. लिटर ठेवला जाईल असे सांगितले होते. आता स्वयंपाक गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या किंमती किती वाढलेल्या आहेत हे आम्हाला सांगायला नको. राज्यात रस्ते चांगले नाहीत. आम आदमी पार्टी, केजरीवाल आणि बंगालचा तृणमूल गोव्यात नको. गोमंतकीय लाचार नाहीत. शिरोडा मतदार संघाबरोबरच गोव्यात या खेपेला काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT