Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: ‘राजकीय भाष्य केल्याने सभापतिपदाची विटंबना’; प्रभाकर तिंबले

Goa Politics: राजकीय विश्‍लेषक प्रभाकर तिंबले यांची परखड प्रतिक्रिया

दैनिक गोमन्तक

Goa Politics: घटनात्मक आणि तटस्थ असणाऱ्या सभापतिपदावर असताना राजकीय भाष्य करू नये, हे संकेत न पाळता विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे राजकीय विधान करून सभापतिपदाची विटंबना केली, अशी टीका राजकीय विश्लेषक प्रभाकर तिंबले यांनी केली आहे.

दै. ‘गोमन्तक’मध्ये आज (२५ नोव्हेंबर) प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तिंबले यांनी नमूद केले की, सभापती पदाची प्रतिष्ठा, पावित्र्य नष्ट करणारे वक्तव्य तवडकर यांनी केले आहे. त्यांनी सभापतिपदाची मर्यादा पायदळी तुडवली आहे.

राज्यातील भाजपचे सरकार भक्कम स्थितीत आहे. सरकारमध्ये अस्वस्थता नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात आणखी बदल होणार नाहीत, अशी विधाने करणे सभापतींना शोभा देत नाही. सभापतिपदाचा अर्थ आणि त्या पदाचे गांभीर्य तवडकर यांच्या लक्षात आलेले नाही असे ठामपणे म्हणता येते. आमदार, मंत्री, सरकार एका बाजूला, विधानसभेचे संरक्षक म्हणून सभापती ही लोकशाहीची शान याची जाणीव त्यांना नसावी ही खंत आहे, असेही तिंबले यांनी म्हटले आहे.

तवडकरांचे वक्तव्य अशोभनीय: भगत

मडगाव:नीलेश काब्राल यांना मंत्रिपदावरून पायउतार होण्याचा आदेश भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी घेतला असून पक्षादेश पाळणे हे पक्ष कार्यकर्त्यांचे काम आहे असे विधान सभापती रमेश तवडकरांनी करणे हे त्यांच्या पदाला शोभत नाही, अशी टीका गोवा फाॅरवर्डचे नेते विकास भगत यांनी केली आहे.

2017 साली पक्ष नेतृत्वाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्यावर बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या तवडकरांनी पक्ष शिस्तीबद्दल बोलणे बंद करावे, असा सल्ला भगत यांनी दिला आहे. किंबहुना सभापती असलेल्या तवडकरांनी पक्षाच्या अंतर्गत बाबींवर बोलणे हेच मुळात नैतीकतेला धरून नसल्याचे भगत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT