Convocation ceremony of 75 constables of 49th batch in Goa  Dainik Gomanta
गोवा

Convocation Ceremony : 'पोलिसांनी वर्दीचा मान राखावा' महासंचालक जसपाल सिंग

Convocation Ceremony : वाळपईत ४९ व्या तुकडीच्या ७५ कॉन्स्टेबलचा दीक्षांत सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

Convocation Ceremony :

वाळपई, कायदा व सुव्यवस्था कायम चांगली राखणे हे मोठे आव्हान असते. हे सर्व करीत असताना समाजात वावरताना पोलिसांनी जबाबदारीने व नियमांचे पालन करूनच कार्यरत राहिले पाहिजे. पोलिसांना खाकी पोषाख हा सहज मिळत नसतो, असे महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांनी केले.

त्यासाठी परिश्रमांची पराकाष्टा करावी लागते. खाकी वर्दी ही पोलिसांची ओळख व शान आहे.

त्याला कधीच डाग लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. समाजात नेहमीच शिस्त पाळून पोलिसांनी खाकी वर्दीचा सदैव मान राखला पाहीजे, असे आवाहन गोवा पोलिस विभागाचे महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांनी केले. ते म्हणाले प्रत्येकाने आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहिजे. कर्तव्याप्रती निष्काळजीपणा नको.

वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात आज ४९ व्या तुकडीच्या ७५ पोलिस कॉन्टेबलच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक तथा पोलिस केंद्राच्या प्राचार्य सुचिता देसाई, उपअधीक्षक तथा उपप्राचार्य नेलोस्को रापोस, गुन्हे विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता, काणकोण विभागाचे अधीक्षक. तिकम सिंग वर्मा, फोंडा विभागाचे अधीक्षक आरशी अदील उपस्थित होते. प्राचार्य सुचिता देसाई यांनी नवीन पोलिसांना प्रतिज्ञा सांगितली. उपप्राचार्य नेलोस्को रापोस यांनी स्वागत केले. अमित नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

कायदा व सुव्यवस्थेकडे गांभीर्याने पाहा

पोलिसांनी आपली प्रतिमा समाजात मलिन होणार नाही यासाठी दक्षता बाळगली पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेकडे गांभीर्याने बघितले पाहिजे व कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी सजग राहिले पाहिजे. डोळे उघडे ठेवून गैरप्रकार रोखले पाहिजे.

रस्ता सुरक्षा ठेवून अपघात रोखणे व ड्रग्जसारख्या गोष्टींना थारा देता कामा नये. कोणत्याही प्रकारचा जातीभेद होऊन समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी कटाक्षाने काम केले पाहिजे, असे गोवा पोलिस विभागाचे महासंचालक जसपाल सिंग यांनी सांगितले.

१० महिला पोलिस सेवेत

६५ पुरुष व १० महिला पोलिस आज सेवेत दाखल झाले. जसपाल सिंग यांनी तुकडीची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. अकरा महिने प्रशिक्षणार्थींना ‘आऊट डोअर’, ‘इन डोअर’ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT