Asgaon  Dainik Gomantak
गोवा

Asgaon Goa: पोलिस की राजकीय नेता? पूजा शर्माच्या पतीचे गूढ कायम, आसगावातील घर पाडल्याचे प्रकरण!

Asgaon Home Demolition Case: पोलिस प्रमुख जसपालसिंग यांनी शर्माचा पती आयपीएस नसल्याची माहिती आज ट्टवीटरद्वारे दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

आसगावमधील घर पाडण्याच्या घटनेला ४ दिवस लोटले असूनही व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले असूनही पोलिसांना अद्याप पूजा शर्माला अटक करण्यात अपयश आले आहे. पूजाला अटक करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

या घटनेत पोलिस अधिकारी स्वतःच गुंतल्याच्या आरोपामुळे या प्रकरणाचे शिंतोडे सरकारवर उडाले असून, पूजा शर्माचा पती एक तर पोलिस किंवा राजकीय नेता असावा, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पोलिस प्रमुख जसपालसिंग यांनी शर्माचा पती आयपीएस नसल्याची माहिती आज ट्टवीटरद्वारे दिल्यानंतर सिंग यांना हा माणूस कोण आहे, याबाबत माहिती आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाच्या मागे पोलिस प्रमुख जसपालसिंग हे स्वतः असल्यानेच बांधकाम मोडतेवेळी तेथे पोलिस संरक्षण देण्यात आले होते, असे सुतोवाच केले होते.

या प्रकरणात अद्याप दोघांना अटक करण्यात आली असून, पोलिसांवर मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी दबाव वाढला आहे. या प्रकरणात डेव्हलपर अर्शद ख्वाजा याला अटक करण्यात आली होती व घर पाडतेवेळी तो तेथे उपस्थित होता. जेसीबी चालक प्रदीप राणा यालाही अटक करण्यात आली आहे. प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या मुलाला अपहृत केल्याचाही आरोप राणा याच्यावर आहे.

स्थानिक आमदार दिलायला लोबो यांनी या प्रकरणात आपल्या सरकारवर आरोप करून पोलिस त्यात गुंतल्याचे म्हटले होते. या प्रकरणात गोव्यातील भूमाफिया, जमीन प्रकरणे यावर चांगलाच उजेड पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT