Drug peddler Dainik Gomantak
गोवा

Drug peddler : अवैध मद्य अन् अमली पदार्थ विक्री प्रकरणी कर्नाटकातील एकाला अटक

पोलिसांनी कारवाई करत सुमारे सव्वा लाखाचा गांजा केला जप्त

दैनिक गोमन्तक

राज्यात अवैध मद्य अन् अमली पदार्थ विक्रीला आळा बसणार की या फक्त घोषणाच असणार असा सवाल आता नागरिक करु लागले आहेत. कारण अशी प्रकरणे थांबण्याऐवजी वाढतच आहे अशी शंका नागरिकांना येत आहे. असे असताना आज कळंगुट पोलिसांनी आणखी एकाला अवैध मद्य अन् अमली पदार्थ विक्री प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

(Police nabbed drug peddler at Calangute )

मिळालेल्या माहितीनुसार डॉल्फिन सर्कल, कळंगुट येथे एक व्यक्ती अवैध मद्य अन् अमली पदार्थ विक्रीसाठी आली असल्याची माहिती मिळाली यावरुन पोलिसांनी तातडीने तपास केला असता एक व्यक्ती अवैध मद्य अन् अमली पदार्थ विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाखाचा गांजा अन् अवैध मद्य साठा जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कारवाई करण्यात आलेला संशयित आरोपीचे नाव मुहम्मद जाफर गुडुमिया असे असून आरोपी मुळ रहिवाशी कारवार, कर्नाटक येथील असल्याची माहिती समोर आली आहे. कारवाई वेळी संशयिताकडून अवैध मद्य साठा आणि सुमारे 1, 10,000 किंमतीचा 1100 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पीएसआय किरण नाईक यांच्यासह एलपीएसआय प्रगती मलिक पीसी विद्यानंद आमोणकर, गणपत तिलोजी, अमीर गरड, विजय नाईक, संज्योत केरकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT