Calangute Police Checks Massage Parlor, Wellness Centre Dainik Gomantak
गोवा

Calangute News: कळंगुटमध्ये मसाज पार्लर, वेलनेस सेंटरची तपासणी; पोलिसांची अचानक कारवाई

वैध परवाने नसलेल्या मालकांना सेंटर बंद करण्याच्या सूचना

गोमंतक ऑनलाईन टीम

Calangute Police Checks Massage Parlor, Wellness Centre: कळंगुट येथील नाईकवाडा मध्ये बेकायदा मसाज पार्लर्स कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामस्थ सोमवारी आक्रमक झाले होते.

या आंदोलनानंतर या पंचायत मंडळाने बेकायदा मसाज पार्लरला टाळे ठोकले होते. त्यानंतर आज, मंगळवारी कळंगुट परिसरातील अनेक मसाज पार्लर, वेलनेस सेंटरची म्हापसा पोलिसांनी तपासणी केली.

कळंगुट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक परेश नाईक, पोलिस उपनिरीक्षक प्रगती मलिक, आरोग्य निरीक्षक कमलाकांत पार्सेकर, कळंगुट व्हिलेज पंचायतीचे प्रतिनिधी शेखर पालयेकर आणि कळंगुट पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पर्वरीचे एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली.

कळंगुट येथील टिट्टोज लेनमधील लेलाई एक्झॉटिक सेंटर, स्नो पार्कजवळील एसओआय थाई, भारत जंक्शन येथील बुद्ध स्पा, भारत जंक्शन येथील डी फ्लोरा, कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली.

यावेळी 'डी फ्लोरा स्पा' वगळता इतर वेलनेस सेंटर आणि स्पामध्ये कर्मचारी उपस्थइत होते. त्यांच्याकडे स्पा आणि वेलनेस सेंटर चालवण्यासाठीच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तथापि, अनेकजण आवश्यक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.

त्यांनी तात्पुरत्या काळासाठी देण्यात आलेली प्रमाणपत्रे दाखवली. तसेच अनेकांनी त्यांचे परवाने सध्या प्रक्रियेत असल्याची माहिती दिली. वैध परवाने नसलेली सेंटर्स, स्पा बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी मालकांना दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT