Goa Police  Dainik Gomantak
गोवा

पोलिसांच्या Cruise Operators ना 'कडक' सूचना! तिकिटे, कर्मचारी नोंद, संगीत या विषयी काटेकोर राहण्याचे आवाहन

Goa Police Guidelines Cruises: गोव्यात सुरू झालेल्या पर्यटन हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर पणजी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी पणजी जेटीवरून कार्यान्वित असलेल्या क्रुझ ऑपरेटर्सची बैठक आज घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

Safety Measures Discussed at Meeting of Cruise Operators By Police

पणजी: गोव्यात सुरू झालेल्या पर्यटन हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर पणजी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी पणजी जेटीवरून कार्यान्वित असलेल्या क्रुझ ऑपरेटर्सची बैठक आज घेतली. त्यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंदणी पर्यटन खात्याकडे करण्याची तसेच रात्री १० वाजल्यानंतर संगीत बंद करावे. या वेळेनंतर संगीत सुरूच राहिल्यास कारवाई होईल, अशा कानपिचक्या दिल्या.

क्रुझ ऑपरेटर्सच्या कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांची सतावणूक होण्याचे प्रकार काहीवेळा घडत असतात. अशावेळी संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याने कारवाई करण्यास अडचणी येतात. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची पोलिसांमध्ये अर्ज सादर करून पडताळणी करण्यात यावी.

क्रुझ बोटीवर संगीत वाजवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी. रात्री १० वाजल्यानंतर संगीत बंद करावे. आपत्कालीन घटनेवेळी आवश्‍यक ती सुरक्षा उपकरणे बोटीवर उपलब्ध ठेवणे. तिकीट आकारणाऱ्यांची पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे. क्रुझ बोटीवरील जलसफरीसाठी अधिकृत तिकीट जारी करावे. भरमसाट तिकिटे आकारून पर्यटकांची लूट न करण्याच्या सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी सुदेश नाईक यांनी क्रुझ ऑपरेटर्सना दिल्या.

व्यवस्थापनाला सूचना

क्रुझ ऑपरेटर्सच्या कर्मचाऱ्यांकडून भरमसाट तिकीट शुल्क आकारून लुटमार होत असल्याच्या कारणावरून तेथील कर्मचारी व पर्यटकांमध्ये भांडणे होण्याबरोबरच कधी त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाल्याच्या घटना नोंद आहेत. त्यामुळे पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी क्रुझ ऑपरेटर्सच्या व्यवस्थापनाला बोलावून योग्य त्या सूचना केल्या व त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी पणजीचे पोलिस निरीक्षक विजय चोडणकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT