Goa Loud Music Issue Canva
गोवा

Loud Music Issue: ड्युटी मास्तरांच्या निलंबनाबाबत तत्परता! इतर पोलिसांवर कारवाई कधी ?

Assagao Noise Pollution: राज्याच्या मुख्य सचिवांना आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर पोलिस संरक्षण न देण्याचेच कारण पुढे

गोमन्तक डिजिटल टीम

Assagao Loud Music Issue

पणजी: आसगाव येथे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या क्लब परिसरात ठरावीक पोलिसांनाच तैनात केल्याच्या आरोपांवरून हणजूण पोलिस ठाण्याचे ड्युटी मास्तर रामा परब यांना निलंबित करण्याची तत्परता दाखवणारे पोलिस खाते इतर पोलिसांवर कधी कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

क्लबवर कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई न करून परब यांच्या निलंबनामागे मेहरनजर हे कारण नसून राज्याच्या मुख्य सचिवांना आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर पोलिस संरक्षण न देण्याचेच कारण आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आसगाव येथील ध्वनिप्रदूषणाबाबत स्थानिकांनी सलग तीन रात्री आंदोलन केले. दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस हेही त्यात सहभागी झाले. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आसगाव परिसरात क्लबचे वीज-पाणी जोड बंद करण्याचे आदेश दिले होते.

त्याच्या आदेशानुसार या क्लबांनी आपले व्यवहार बंद केले पाहिजे होते. तसे न करता जनरेटरच्या साहाय्याने आणि टॅंकरमधून पाणी आणून सरकारी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून या क्लबमध्ये रात्रीच्या वेळी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत होते. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आसगाव येथे रात्रीच्यावेळी भेट दिली असता ही बाब उघड झाली होती. त्यावेळी पोलिस खात्याकडून आम्हाला क्लब बंद करण्याच्या आदेशांची काही कल्पनाच नाही, असा दावा करण्यात आला होता.

परब हे त्या क्लबांच्या परिसरात ठरावीक पोलिसांनाच काम देत होते, अशा तक्रारी होत्या. ते कामाच्या वाटपात पक्षपात करतात, असेही त्या तक्रारींत नमूद केले होते. याबाबत पोलिस निरीक्षक व उपअधीक्षकांचे म्हणणे घेतल्यावर परब यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अक्षत कौशल, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT