Suleman Khan Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: कोठडीतून पलायन प्रकरण! कॉन्स्टेबलसहित सुलेमान खानवर आरोप निश्चित

Suleman Khan Escape: सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, सुलेमानने पहारा देणारा पोलिस कर्मचारी अमित नाईक याच्याशी संगनमत करून हे पलायन केले. अमितने सुलेमानला कोठडीतून बाहेर काढले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पोलिस कोठडीतून आरोपी सुलेमान खानला पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी अमित नाईक, आरोपी सुलेमान खान आणि हजरतसाब बवन्नवार यांच्यावर आरोप निश्चित करण्याचे आदेश मेरशी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.

१३ डिसेंबर २०२४ रोजी सिद्धिकी ऊर्फ सुलेमान खान हा रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या कोठडीतून पळाला होता. त्याला म्हापसा पोलिसांच्या एका गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, सुलेमानने पहारा देणारा पोलिस कर्मचारी अमित नाईक याच्याशी संगनमत करून हे पलायन केले. अमितने सुलेमानला कोठडीतून बाहेर काढले आणि दोघेही मोटारसायकलवरून पसार झाले.

त्यानंतर कर्नाटकच्या हुबळीमध्ये हजरतसाब बवन्नवार याने सुलेमानला लपवून ठेवण्यास मदत केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांची तपासणी केल्यानंतर तिघांविरोधात खटला चालवण्याइतपत सबळ पुरावे असल्याचे स्पष्ट केले आहे.

सुलेमान खानवर कोठडीतून पलायन आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल बीएनएस कलम २६२, ६१(२)(अ) नुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तसेच अमित नाईकवर सरकारी नोकर असूनही आरोपीला पळवून नेणे, आश्रय देणे आणि जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

SCROLL FOR NEXT