Traffic Police Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 2021 मध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून 8 कोटींचा दंड वसूल

मागील वर्षी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 7 लाख 41 हजार 319 जणांवर कारवाई करत पोलिसांनी 8 कोटी दंड वसूल केला.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी मागील वर्षी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून तब्बल 8 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकी चालकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. यापाठोपाठ सीट बेल्ट न घातलेल्या चालकांवर कारवाई करण्यात आली.

गोवा पोलिस आणि वाहतूक पोलीस (Traffic Police) विभागाने वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला उगारला आहे. राज्यात होणारे अपघात आणि नियमांचे उल्लंघन कमी करण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मागील वर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 7 लाख 41 हजार 319 जणांवर पोलिसांनी कारवाई केली, अशी माहिती समोर आली आहे. हेल्मेट न घातलेल्या चलकांकडून (Driver) 2 कोटी 52 लाख दंड वसूल करण्यात आला. दारू पिऊन गाडी चलवणाऱ्या 266 लोकांना दंड भरावा लागला आहे. पोलिसांनी (Police) लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT