Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Hubli Crime: हुबळीत दरोडेखोरांचा धुडगूस! चकमकीत 2 पोलिस जखमी; दोघांना पकडले; गोव्यासह महाराष्ट्रात होते ‘वॉन्टेड’

Hubli Shootout: गुरुवारी पहाटे हुबळी येथील पोलिस प्रशिक्षण शाळेजवळ पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयित दरोडेखोरांना चकमकीनंतर पकडण्यात यश आले.

Sameer Panditrao

बंगळूर: गुरुवारी पहाटे हुबळी येथील पोलिस प्रशिक्षण शाळेजवळ पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयित दरोडेखोरांना चकमकीनंतर पकडण्यात यश आले, अशी माहिती हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिली. ही घटना विद्यानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. यावेळी एक पोलिस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलही जखमी झाले आहेत.

बुधवारी (ता. २३) रात्री दूरदर्शनचा एक कर्मचारी दुचाकीवरून घरी परतत असताना सशस्त्र दरोडेखोरांनी त्याला थांबवले आणि लुटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पळून जाऊन त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत हुसेनसाब कानवल्ली या संशयिताला ताब्यात घेतले.

हा कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील सुमारे ३५ हून अधिक चोरीच्या प्रकरणांमध्ये ‘वॉन्टेड’ होता. कानवल्लीची चौकशी केल्यानंतर, त्याला टोळीतील सदस्य रहात असलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली. जेव्हा पोलिस त्या ठिकाणी गेले, तेव्हा कानवल्लीने पोलिसांवर हल्ला केला आणि पळून गेला. नंतर, विजय अन्निगेरी आणि मुझम्मिल सौदागर या दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन व कॉन्स्टेबल इशाक हे जखमी झाले. मल्लिकार्जुन यांनी स्वसंरक्षणार्थ संशयितांच्या पायात गोळी झाडली. दोन्ही संशयित एका संघटित दरोडेखोर टोळीचा भाग असल्याचे सांगितले जाते. पोलिसांच्या देखरेखीपासून वाचण्यासाठी, या टोळीने फोन संभाषण टाळून, इंस्टाग्राम संदेशांचा वापर करून त्यांच्या कारवायांची योजना आखल्याचे तपासात समोर आले, असे शशिकुमार यांनी सांगितले.

दरम्यान, धारवाड जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन शशिकुमार जखमी मल्लिकार्जुन आणि इशाक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच कडक पोलिस बंदोबस्तात उपचार घेत असलेल्या अन्निगेरी आणि सौदागर यांची पाहणी केली.

कानवल्लीसाठी शोधमोहीम

दूरदर्शनच्या एका कर्मचाऱ्याकडून तीन जणांनी दुचाकी हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, धारवाडमधील तीन पोलिस ठाण्यांच्या पोलिस पथकांनी तपासणी नाके उभारले आणि कानवल्लीला अटक करण्यात यश आले. मात्र इतर संशयितांना पडण्यासाठी त्याला त्याठिकाणी नेण्यात आले होते, तेथून तो पळून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT