Banastarim Bridge Accident, Mardol police station Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघातप्रकरणी पोलिसांची कृती शंकास्पद; स्वप्निल भोमकर

अपघाताची दृश्‍ये आठवली की अंगावर काटा येतो!

दैनिक गोमन्तक

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी पूलावर अपघात घडला त्यावेळी मी तेथे 5 ते 10 मिनिटात पोहोचलो. अपघाताचे दृश्‍य आठवलेकी अंगावर काटा उभा राहतो. तो अपघात एवढा भयावह होता की, मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या अपघातातील मृतांच्या फडते कुटुंबीयांना पोलिस न्याय मिळवून देतील, असा दावा करत आहेत.

परंतु वास्तविक पोलिसांची कारवाई पाहता अपघातास कारणीभूत चालकाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे दिसून येते. त्यामुळे पोलिसांच्या कृतीबाबत शंका व्यक्त होत असल्याचे मत दिवाडीचे उपसरपंच स्वप्निल भोमकर यांनी व्यक्त केले.

ते ‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात ॲड. रविराज चोडणकर तसेच ‘गोवा रोड सेफ्टी फोरम’चे अध्यक्ष दिलीप नाईक बोलत होते. दरम्यान भोमकर म्हणाले, पोलिसांनी जी जबानी नोंदविली आहे, त्यात वेगळेपणा दिसून येत आहे.

ज्यावेळी मेघना सावर्डेकर पोलिसांना चालकाच्या आसनावर दिसली. त्यावेळी तिची देखील तपासणी करणे गरजेचे होते. अपघात कोणीही केला तरी, वाहनाच्या मालकाला पोलिस स्थानकात बोलावले जाते. परंतु तिला अद्याप बोलावले जात नाही, या सगळ्या घटनांमुळे पोलिसांवरील सांशकता अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हाताचे ठसे का घेतले नाहीत ?

पोलिसांची चौकशी ही अपघातग्रस्तांना न्याय देण्याच्या अनुषंगाने नसून अपघातास कारणीभूत व्यक्तीला वाचविण्याच्या दृष्टीने होत असल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर वाहन कोण चालवत होते, हे कळण्यासाठी हातांचे ठसे घेणे गरजेचे होते. प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलींगकर यांची जबानी ग्राह्य धरली जात नाही.

एका मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय असून म्हार्दोळ पोलिसांनी आपली विश्‍वासार्हता गमावल्याने या अपघाताची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी ॲड. रविराज चोडणकर यांनी केली.

दुदैवाने तसे घडत नाही !

अपघात घडतो, त्यावेळी वाहनातील व्यक्ती शक्य तेवढ्या लवकर वाहनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते. अपघातानंतर सीट बदलत नाहीत. बाणस्तारी पुलावर जो अपघात झाला, त्यातील गाडीचा वेग 100-120 किमी प्रति तास एवढा असण्याची शक्यता आहे. ज्यावेळी अपघात होतो, त्यावेळी पोलिसांनी दुखापतग्रस्त तसेच मृत व्यक्तींना आधी पाहिले पाहिजे,त्यांना ताब्यात घेतले पाहिजे. आल्कोमीटरचा वापर केला पाहिजेच,परंतु दुदैवाने तसे घडताना दिसत नाही,अशी खंत दिलीप नाईक यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT