Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: वाकड्या अंगठ्याने पोलिसांना पोचविले खुन्यापर्यंत!

Goa Crime News: पद्मलोचन खूनप्रकरण: तिघांना अटक; डॉ. घोडकिरेकर यांची चौकस बुद्धी आली कामी

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: पाच दिवस समुद्रातील पाण्यात कुजलेल्या स्थितीतील आणि माशांनी तोंड खाल्ल्याने ओडिशा येथील कामगार पद्मलोचन सलिमा याच्या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र, यावेळी पोलिसांच्या मदतीला धावून आले ते शव चिकित्सक डॉ. मधू घोडकिरेकर.

पद्मलोचन सलिमा याच्या पायाचा अंगठा जन्मजात व्यंगामुळे वाकडा झाला होता. त्यावरूनच डॉ. मधू घोडकिरेकर यांनी आपली चौकस बुध्दी वापरून या मृताची ओळख पटवली. त्यामुळे पोलिसांना खुन्यांपर्यंत पोचण्यात यश आले. दरम्यान, पद्मलोचन सलिमा याच्या खून प्रकरणी पोलिसांनी आज तिघांना ताब्यात घेतले आहे.

8 जानेवारी रोजी मालीम मच्छीमार जेटीवरून निघालेल्या एका ट्रॉलरवरून मूळ ओडिशा येथील एक कामगार गायब झाला होता. त्याची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकावर नोंदवली होती. त्यानंतर 12 जानेवारी रोजी वास्को परिसरात समुद्रात गस्त घालण्यासाठी गेलेल्या नौदल जवानांना समुद्रातील एका बेटाजवळ एक मृतदेह सापडला.

मात्र, त्याचा चेहरा ओळख पटण्याच्या पलीकडे गेला होता. हा मृतदेह हार्बर किनारपट्टी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर तो गायब झालेल्या त्या खलाशाचा तर नव्हे ना, अशी शंका पोलिसांना आली. तोपर्यंत त्या खलाशी कामगाराचे वडीलही गोव्यात पोहोचले होते, पण तेही या मृतदेहाची ओळख पटवू शकले नव्हते. त्यामुळे त्या दोघांची डीएनए चाचणी करून ओळख पटविण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी घेऊन पोलिस डॉ. घोडकिरेकर यांच्याकडे गेले होते.

या मृताची ओळख पटल्यावर पोलिस तपास सुरू झाला. ट्रॉलरवरील इतर कामगारांची चौकशी केली असता एकाने त्या कामगाराला ढकलून पाण्यात टाकले अशी माहिती मिळाली. पोलिसांनी संशयिताला अटकही केली. तात्पर्य असे की पोलिसांना या खुन्यापर्यंत या वाकड्या अंगठ्यानेच पोचविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT