Touts Arrested On Calangute Beach Dainik Gomantak
गोवा

Touts Arrested: किनाऱ्यांवरील अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई; 21 दलाल कळंगुट पोलिसांच्या ताब्यात

राज्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांची लुबाडणूक करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Touts Arrested On Calangute Beach: समुद्रकिनाऱ्यांवर अवैध धंद्यांना चांगलाच ऊत आला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. राज्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांची लुबाडणूक करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. यासंदर्भात पोलीस प्रशासन सतर्क असून ते सापळा रचत अशा दलालांना पकडण्याचे काम करत आहेत. काल रात्री कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

काल (9 जून) रात्री उशिरा पोलिसांनी कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर मोहीम राबवत अशा 21 दलालांना अटक करण्यात आली आहे. या दलालांवर व्यापार आणि पर्यटन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. कळंगुट येथे क्रॉस मसाज पुरविण्याच्या नावाखाली हरियाणा येथील दोन पर्यटकांची लुबाडणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी कळंगुट येथील मसाज पार्लरच्या दोन कामगारांना अटक केली होती. शनिवारी (दि. 03) दुपारी ही घटना घडली.

पर्यटकांची लुबाडणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अरूण मलिक (रा. हरियाणा) यांनी तक्रार दाखल केली . पोलिसांनी संशयितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 323, 506 (ii), 342, 420 व 392 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT