Morjim School Repair Dainik Gomantak
गोवा

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim government school roof repair delay: पोकेवाडा-मोरजी येथील शाळेच्या दुरुस्तीचे काम एक महिना उलटूनही हाती घेतले नसल्याने गोवा बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी नाराजी व्यक्त केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मोरजी: पोकेवाडा-मोरजी येथील शाळेच्या दुरुस्तीचे काम एक महिना उलटूनही हाती घेतले नसल्याने गोवा बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी नाराजी व्यक्त केली.

शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या विषयाची गांभीर्याने दखल घेत सोमवारी तातडीने सुनावणी घेण्याचे त्यांनी ठरविले आहे.या भेटीदरम्यान शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न तसेच अंगणवाडीसाठी केलेली व्यवस्था पुनाजी यांच्या निदर्शनास आली.

दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झाले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महिनाभरानंतरही काम हाती घेतले नसल्याने शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. अंगणवाडीची व्यवस्था स्टेजवर करण्यात आली असून, ही व्यवस्था योग्य नसल्याचेही पुनाजी यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: 'जल है तो कल है'! यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे गोव्यात पाणीटंचाईचे गडद संकट

Uttar Pradesh Assembly Election 2027: उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप, राममंदिर, राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे मुद्दे झाले जुने; योगी आदित्यनाथ यांची अग्निपरिक्षा

राजकीय आरक्षणाच्या हक्कासाठी आदिवासी समाज रणांगणात उतरणार; आगामी विधानसभा निवडणुकीत 23 मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचा ‘उटा’चा निर्णय

खून, घरफोड्या आणि अत्याचाराच्या घटनांमुळे काणकोणवासीयांमध्ये रोष, मूक आंदोलनातून सरकारचं वेधलं लक्ष; कठोर कारवाईची केली मागणी

Goa Political Alliance: विरोधकांचे आघाडीचे पाऊल; जागावाटप पुन्‍हा लांबणीवर! फॉरवर्ड, आरजीसोबतच्‍या बैठकीला गिरीश, युरींची दांडी

SCROLL FOR NEXT