PM Narendra Modi Visit to Goa: Madgaon KTC Bus Stand Closed from 1st to 8th February  Dainik Gomantak
गोवा

PM Modi Visit in Goa: पंतप्रधान मोदींचा गोवा दौरा; मडगाव केटीसी बसस्थानक 1 ते 8 फेब्रुवारीपर्यंत बंद...

PM Narendra Modi Goa Daura: कदंब बसेस जलतरण तलावाजवळील क्रीडा प्राधिकरण मैदानावर हलवल्या आहेत.

Kavya Powar

PM Narendra Modi Sabha in Goa:

येत्या 6 फेब्रुवारीला मडगावात पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे. ही सभा मडगाव बसस्थानकाच्या मैदानावर होणार असून याबाबत जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी याच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

त्यामुळे बसस्थानकातून सध्याच्या बसेस एसएजी मैदानावर हलवण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी अधिसूचना जारी केली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान केटीसी बसस्थानक तात्पुरते बंद ठेवण्याची अधिसूचना देखील त्यांनी दिली.

आंतरराज्य बसेस आधीच SGPDA पार्किंग ग्राउंडवर हलवण्यात आल्या आहेत. तर कदंब बसेस जलतरण तलावाजवळील क्रीडा प्राधिकरण मैदानावर हलवल्या आहेत. 

याबाबत दिगंबर कामत म्हणाले की, पंतप्रधान मोदी या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनांवर बोलणार असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्य सरकारच्या कामगिरीवर उपस्थितांना संबोधित करतील. यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यातील पंतप्रधानांची ही पहिलीच सभा असल्याने इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे अधिकारीवर्ग आणि पोलीस यासाठी सज्ज आहेत.

दरम्यान, या कालावधीत परिसरातील व्यावसायिकांनाही आपली दुकाने बंद करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT