PM Vidya Lakshmi Scheme Dainik Gomantak
गोवा

PM Vidya Lakshmi Scheme: मोदी सरकार देतंय विद्यार्थ्यांना 10 लाखांपर्यंत कर्ज; अर्ज कसा करावा, पात्रतेचे निकष काय?

Government Education Loan Scheme: उच्च शिक्षण मिळवण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

Pramod Yadav

PM Vidya Lakshmi Scheme How To Apply

पणजी : आर्थिक अडचणीमुळे आता कोणाचेही उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहणार नाही. केंद्र सरकारने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PM विद्यालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. विद्यालक्ष्मी हा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 7.5 ते 10 लाख रुपयांपर्यंत हमी आणि तारणमुक्त शैक्षणिक कर्ज घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला नोव्हेबर २०२४ मध्ये मंजुरी दिलीय.

विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळवण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. PM विद्यालक्ष्मी योजनेसाठी पात्रता काय आहे? यासाठी अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती या लेखातून घेणार आहोत.

PM विद्यालक्ष्मी योजनेसाठी पात्रता काय आहे? Eligibility Criteria

- विद्यार्थी भारतीय नागरिक असावा.

- दहावी आणि बारावीची परीक्षा (१० + २) उत्तीर्ण असावा.

- विद्यार्थी संबधित महाविद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असावा.

- विद्यार्थी देशात किंवा परदेशात उच्च शिक्षणासाठी अर्ज करु शकतो.

PM विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज कसा करायचा? PM Vidya Lakshmi Scheme How To Apply?

१) सर्वप्रथम www.vidyalakshmi.co.in या संकेतस्थळावर जा.

२) संकेतस्थळावरील Apply Now या टॅबवर क्लिक करा

३) नवीन उघडलेल्या विंडोवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल (Create Your Account) या नव्या विंडोत तुमचे खाते तयार करा.

४) खाते तयार करताना तुमचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पासवर्ड यासारख्या बाबी भराव्या लागतील.

५) नोंदणीसाठी नाव देताना दहावीच्या प्रमाणपत्रानुसार द्या, मोबाईल नंबर आणि ई-मेल अधिकृत असणारेच द्या.

६) यानंतर मेलवर एक Activation लिंक येईल, त्यावरुन तुमचे खाते सत्यापित करा.

नोंदणीनंतर कर्जासाठी अर्ज कसा करायचा?

१) नोंदणीनंतर सर्च आणि अप्लाय लोन (Search And Apply Loan) या पर्यायावर क्लिक करा.

२) यानंतर देशात कि विदेशात शिक्षण घ्यायचंय तो पर्याय निवडा

३) तुमच्या कोर्स/ अभ्यासक्रमाची माहिती द्या

४) तुमच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या कर्जाची रक्कम द्या

५) यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा करा.

६) अर्ज जमा करण्यापूर्वी सर्व भरलेल्या माहितीची खातरजमा करुन अर्ज 'सबमिट' करा

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे! (List Of Required Documents)

- अर्जासाठी दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

- सरकारी ओळखपत्र (पॅन कार्ड, आधार कार्ड इ.)

- विदेशात शिक्षण घेणार असेल तर वैध व्हिसा, शैक्षणिक व्हिसा आवश्यक असेल.

- जन्म दाखला

- दहावी आणि बारावीचे गुणपत्रिक, प्रमाणपत्र

- महाविद्यालयाचे प्रवेशाचे पत्र आणि अभ्यासक्रमाची फी याची माहिती, सोबत असणे आवश्यक आहे.

PM विद्यालक्ष्मी योजनेचे लाभ काय आहेत? (Benefits Of PM Vidya Lakshmi)

- विद्यार्थी 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी पात्र असेल. थकबाकीच्या प्रकरणात विद्यार्थी 75 टक्के कर्जहमीसाठी पात्र असेल.

- आठ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा व्याज सवलत योजनेसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कर्ज परतफेडीच्या काळात 3 टक्के व्याज सवलत दिली जाईल.

- विद्यार्थ्यांना केवळ देशातील उच्च मानांकन असलेल्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करता येऊ शकतो. यासाठी National Institutional Ranking Framework (NIRF) यानुसार जाहीर करण्यात आलेल्या (higher educational institutions) HEI महाविद्यालयांचा समावेश असेल.

- दरवर्षी ही यादी बदलत असते यात राज्य आणि देश पातळीवरील महाविद्यालयांचा समावेश असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT