PM Surya Ghar Yojana Dainik Gomantak
गोवा

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

Goa Solar Panel Subsidy: ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत घरांच्‍या छतावर सोलर पॅनेल बसवण्‍यासाठी राज्‍यातून आतापर्यंत ४,५२९ अर्ज नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडे गेलेले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत घरांच्‍या छतावर सोलर पॅनेल बसवण्‍यासाठी राज्‍यातून आतापर्यंत ४,५२९ अर्ज नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडे गेलेले होते. त्‍यापैकी ३,३२३ घरांवर सोलर पॅनेल बसवण्‍यात आल्‍याचे केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्‍यमंत्री श्रीपाद नाईक यांनी खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्‍यसभेत विचारलेल्‍या लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून स्‍पष्‍ट केले आहे.

केंद्र सरकारच्‍या ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळते. घरांच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी एक किलोवॅट सिस्टमसाठी ३० हजार, दोन किलोवॅट सिस्टमसाठी ६० हजार तसेच तीन किलोवॅट किंवा त्‍यापेक्षा अधिक सिस्टमसाठी ७८ हजार रुपयांची सबसिडी देते.

सोलर बसवण्यासाठी कमी व्याजदरात बँकांकडून कर्ज मिळते. केंद्राच्‍या या योजनेचा लाभ मिळवण्‍यासाठी आतापर्यंत ४,५२९ गोमंतकीयांनी अर्ज केलेले होते.

त्‍यापैकी ३,३२३ जणांचे अर्ज मंजूर करीत, त्‍यांच्‍या घरांवर सोलर पॅनेल बसवण्‍यात आले असून, त्‍यांना केंद्राकडून २२.५८ कोटींची सबसिडीही देण्‍यात आलेली आहे, असेही मंत्री नाईक यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT