PM Narendra Modi Goa Visit: Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगावातील भिकाऱ्यांच्या स्थलांतराची समस्या जैसे थे! पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेपूर्वी...

परिसरातील वाढत्या भिकाऱ्यांच्या संख्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची नितांत गरज.

Kavya Powar

PM Narendra Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 6 फेब्रुवारीला मडगाव येथील बसस्थानकाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मडगावात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त परिसरात वावरत असलेल्या भिकाऱ्यांच्या सततच्या समस्येवर अधिकारी उपाययोजना करत आहेत.

अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट आणि मडगावमधील जुने मार्केट सर्कल यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या परिसरात असलेल्या आणि फूटपाथवर झोपणाऱ्या भिकाऱ्यांना स्थलांतरित करण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांसमोर एक मोठे आव्हान म्हणून उभी आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी अलीकडेच वेर्णा औद्योगिक वसाहत आणि मडगाव येथे भिकारी आणि स्थलांतरितांविरुद्ध मोहीम राबवली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे भिकाऱ्यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवली जाईल, असे कोठावळे यांनी सांगितले. यासाठी पोलिसांसह संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. त्यांच्यामते, परिसरातील वाढत्या भिकाऱ्यांच्या संख्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची नितांत गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

Goa Cultural: गोव्यातील गणपतीची अनोखी काष्ठशिल्प परंपरा! च्यारी-चितारी समाजाच्या हातातून साकारलेले लाकडी गणेशरूप, शेकडो वर्षांचा समृद्ध वारसा

संपादकीय: अहवालप्रवण प्रशासन

SCROLL FOR NEXT