Adani Group Dainik Gomantak
गोवा

Adani Group: पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मैत्री करून अदानींनी गोव्यासह देशभरातील लुटल्या बँका

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकाशी मैत्री करून गौतम अदानी यांनी गोव्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेचे एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवलेला पैसा हडप केला,अशी टीका भारतीय काँग्रेस नेत्याकडून करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Adani Group: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकाशी मैत्री करून गौतम अदानी यांनी गोव्यासह देशभरातील सर्वसामान्य जनतेचे एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवलेला पैसा हडप केला. तरीही केंद्र सरकार मूग गिळून गप्प आहे, अशी टीका अ​खिल भारतीय काँग्रेसच्या डेटा अॅनालिसिस विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केली. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सरचिटणीस अर्चित नाईक व उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर व इतर उपस्थित होते. अदानी आपल्या भावाच्या सहकार्याने शेअर्सच्या किमतीत फेरफार करीत असल्याचा अहवाल हिंडेनबर्ग यांनी सार्वजनिक केल्यानंतर अदानींचे खरे रूप जगासमोर आले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आले.

तेव्हा अदानींकडे 6 बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती होती आणि सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते देशात 609 क्रमांकावर होते. परंतु, 2022 मध्ये त्यांची संपत्ती 150 बिलियन डॉलर्सवर गेली. अवघ्या आठ वर्षांत त्यांच्या संपत्तीत 2,300 टक्क्यांनी वाढली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या देशाच्या दौऱ्यावर जातात, त्या देशातील विविध कंत्राटे अदानी ग्रुपला मिळतात हे जगजाहीर झाले. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी किती विदेश दौरे केले,

कोणकोणत्या दौऱ्यांवेळी अदानी त्यांच्यासोबत होते आणि अदानींना कोणकोणत्या देशांतील प्रकल्प मिळालेले आहेत, असे प्रश्न काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विचारले होते. पण मोदींनी त्यावर उत्तर देणे टाळले.

भाजपकडून दुर्लक्ष

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कोळसा घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपने केंद्रात सत्तेत येताच, हा विषय दुर्लक्षित केला. पंतप्रधान मोदींनी देशातील कोळशाच्या खाणी बंद केल्या आणि अदानींना ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियातील खाणी विकत घ्यायला लावल्या.

अदानींकडून कोळसा विकत घेण्यास सुरुवात केली व सध्या देशात जवळपास 66 टक्के वीज कोळशावर तयार केली जाते. गोव्यात विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. केवळ अदानींना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेवर विनाकारण वीज दरवाढ लादत असल्याचे ओलान्सिओ सिमोईश यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT