Plan Goa trip Dainik Gomantak
गोवा

Plan Goa trip: पहा कुठे जाण्यासाठी देण्यात आली परवानगी

गोव्यातील काही लोकप्रिय बीच आणि डेस्टिनेशन आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

Priyanka Deshmukh

देशभरात कोरोनाव्हायरसच्या (Covid-19) दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आले होते. मात्र गोव्याच्या (Goa) आजूबाजूला असलेले काही राज्य आता अनलॉक (Unlock) करण्यात आले आहेत. त्यातच गोव्यात कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे काही महिन्यांसाठी बंद राहिलेला गोवा अखेर पर्यटकांसाठी (Tourism) पुन्हा खुला झाला आहे.

Goa tourist places

प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालांनुसार, गोव्यातील काही लोकप्रिय बीच आणि डेस्टिनेशन आता पर्यटकांसाठी (Tourism) खुले करण्यात आले आहे. 14 दिवस आधी दोन्ही लसीचे (Vaccine) डोस घेतलेल्या प्रवाशांना तसेच ICMR लॅबद्वारे मान्यताप्राप्त कोविड -19 चाचणी अहवाल असलेल्या प्रवाशांना गोव्यात प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. (केरळमधून येणाऱ्यांना वगळता ज्यांचा आरटी-पीसीआर अहवाल नकारात्मक असेल त्यांना गोव्यात थेट प्रवेश देण्यात येणार आहे.) हा निर्णय राज्यातील कोविड -19 प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असल्याने घेण्यात आला आहे. राज्यात सध्या कोरोनामुळे दगावलेल्या रूग्णांची संख्या शुन्यावर आली आहे. मात्र गेल्या अकरा दिवसात गोव्यात पन्नास हजार चाचण्या करण्यात आल्या आहे.

Goa tourist places

यापूर्वी, सणांच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नवीन एसओपी जाहीर केली होती ज्यात, संपूर्ण लसीकरण आणि नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांना गोव्यात प्रवेश मिळणार असे जाहीर केले होते.

Goa tourist places

ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG) चे अध्यक्ष नीलेश शाह TOI सोबत बोलतांना म्हणाले की, गोवा खुल्या मनाने पर्यटकांचे स्वागत करण्यास तयार आहे. गोवा सरकारने नियमांचे अनुसरण करण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत, तर पर्यटन व्यवसायासाठी नविन मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित केली आहेत. गोव्याच्या नागरीकांनी किमान लसीचा एक डोस घेतला आहे. त्यामुळे लसिकरण येत्या महिन्यात 100 टक्के पुर्ण होणार. पुढील 90 दिवसांमध्ये गोव्यातील पूर्ण नागरिकांचे दोन्ही डोससह लसीकरण केले जाईल.

शांतादुर्ग मंदिर गोवा

मात्र गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्ग मंदिर अद्याप पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गोवा विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी आनंद व्यक्त केला. गोवा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला होत आहे, आणि हे एक 'चांगले लक्षण' आहे कोविडमुळे विमान उद्योगाला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र आता गोव्यात दाबोळी विमानतळावर देशातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवासी विमानांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळावर विमानांच्या लँडिंगमुळे विमानतळ पुन्हा गजबजू लागले आहे. शारजाह येथून 160 प्रवाशांना घेऊन एअर अरेबियाचे विमान आल्याची माहिती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी ‘गोमन्तक’ ला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT