laid Foundation stone for the renovation of Samadhi Bhausaheb Bandodkar Dainik Gomantak
गोवा

Goa News: बांदोडकर स्मारक नूतनीकरणासाठी अद्याप आराखड्याचा पत्ताच नाही!

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाची सुरूवात करण्यासाठी सरकारने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त साधले खरे, पण अद्याप त्या स्मारकाचा नूतनीकरणाचा आराखडा ठरायचा आहे.

दैनिक गोमन्तक

Bhausaheb Bandodkar: राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाची सुरूवात करण्यासाठी सरकारने त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त साधले खरे, पण अद्याप त्या स्मारकाचा नूतनीकरणाचा आराखडा ठरायचा आहे.

गोवा साधन सुविधा विकास महामंडळाने या कामासाठी सल्लागार कंपनीचीही नियुक्ती केलेले नाही. केवळ सहा कोटी रुपये खर्च येईल, असे अपेक्षित धरून हे काम हाती घेण्यात येणार आहे.

या स्मारकाशेजारी स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्मृतीस्थळ आहे. त्याला पारदर्शक छप्पर आहे. त्याच धर्तीवर बांदोडकर स्मारकालाही छप्पर असावे, अशी संकल्पना महामंडळाने विचारात घेतली आहे. त्याशिवाय स्मारकाच्या दोन्ही बाजूला लॅण्डस्केपिंग करण्यात येणार आहे. हे सारे करताना समाधी स्थळाचे कुंपण पाडून ते खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथे कोणी कधीही जाऊ शकेल.

सध्या समाधी स्थळ जयंती, पुण्यतिथीचा कार्यक्रम वगळता इतर वेळी कुलूपबंद ठेवण्यात येत असल्याने त्याबाबत समाज माध्यमांवर टीका होत होती. त्याचीही दखल घेण्यात आली आहे.

स्मारकाच्या ठिकाणी असलेल्या फरश्या बदलण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय तेथे बसवण्यात आलेले मार्बल सध्या पडतात, तसे काळे पडू नयेत, याचीही काळजी या नूतनीकरणात घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बांदोडकर पुण्यतिथीदिनी या कामाची औपचारिक सुरुवात करताना वर्षभरात स्मारकाचे नूतनीकरण पूर्ण केले जाईल, असे जाहीर केले आहे.

त्यासाठी हे स्मारक कसे असेल, याची माहिती गोवा साधनसुविधा विकास महामंडळातून मिळवण्याचा प्रयत्न केला असता नूतनीकरणाचा आराखडाच तयार केला गेला नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

स्मारकात सध्या पावसाचे पाणी झिरपते, ते टाळण्यासाठी स्मारक आणि परिसराला छप्पर घालण्याचे ठरवण्यात आले आहे. नूतनीकरण करताना स्मारकाची उंची कमी न करता हे काम मार्गी लावण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

सर्वांशी संवाद साधणार!

गोवा साधन सुविधा महामंडळ महामंडळाशी सलग्न असलेल्या सल्लागार कंपन्यांकडून बांदोडकर स्मारक नूतनीकरणाबाबत संकल्पना मागवणार आहेत. त्यानंतर बांदोडकर यांचे कुटुंबीय व अन्य संबंधित यांच्याशी चर्चा करूनच नूतनीकरण कसे केले जावे याचा निर्णय घेतला जाणार आहे.

हा संवेदनशील विषय असल्याने स्मारकाच्या कोणत्या भागाला धक्का लावला जाऊ नये, याविषयी मते जाणून घेतली जाणार आहेत. आराखडा तयार केल्यानंतरही सर्वांशी संवाद साधण्याची महामंडळांची तयारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT