Pitbull Dog 
गोवा

Pitbull कुत्र्याचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीने गूढ वाढले

Goa News: कुत्र्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी व्हिसेरा लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. तसेच, टॉक्सिलॉजिकल अहवाल प्रलंबित आहे.

Pramod Yadav

पणजी: हणजूण येथे सात वर्षीय मुलाचा पिटबुल जातीच्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. घटनेच्या पाच दिवसानंतर या हल्ल्यातील पिटबुल कुत्र्याचा देखील मृत्यू झाला. कुत्र्याचा मृत्यू कसा झाला याची शवविच्छेदनातून माहिती समोर आली आहे. पण, शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीने कुत्र्याच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

हणजूण येथे पिटबुल कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात प्रभास प्रेमानंद कळंगुटकर याचा मृत्यू झाला. मृत मुलाची आई घरकाम करत असलेल्या घरातील कुत्र्यानेच हल्ला केल्याने ही घटना घडली. यानंतर कुत्र्याची शिवोली येथील वेल्फअर ऑफ एनिमल्स इन गोवा येथे प्राणी कल्याण संस्थेत रवानगी करण्यात आली.

या संस्थेत कुत्र्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. कुत्र्याचा अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी व्हिसेरा लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. तसेच, टॉक्सिलॉजिकल अहवाल प्रलंबित आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुत्र्याचा मालक अब्दुल कादर ख्वाजा (रा. मूळ पर्वरी) याला अटक केली. संशयित न्यायलायीन कोठडीत आहे.

मालकाच्या अटकेनंतर कुत्र्याची रवानगी प्राणी कल्याण संस्थेत करण्यात आली होती. येथेच त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Flyover: "पर्वरी उड्डाणपुलाचे काम वाहतूक न थांबवता पूर्ण करा", मंत्री खंवटे यांचे कंत्राटदारांना निर्देश

Goa Politics: खरी कुजबुज; रवींनी 'तो' निर्णय का घेतला?

Salcete: नवीन कचरावाहू कॉम्पॅक्टर निकामी, मडगाव पालिकेने मागविलेल्या वाहनात तीनच दिवसांत बिघाड

Goa Live News: गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर

FC Goa vs Al Nassr: फातोर्डा मैदानाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त, आज रंगणार एफसी गोवा-अल नस्सर यांच्यातील फुटबॉल सामना

SCROLL FOR NEXT