Pissurlem Water Problem Dainik Gomantak
गोवा

कारोकोपरो गावात पाण्याचा दुष्काळ, घागर मोर्चा काढण्याचा इशारा

पाण्यासाठी नागरिकांची चार किलोमीटर पायपीट

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : भिरोंडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या वांते येथिल कारोकोपरो या 16 घरे असलेल्या लोकवस्तीच्या वाड्यावर आठ दिवस झाले नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यामुळे घरातील लाहन थोर मंडळीं दिवस भर चार किलो मिटर पायपीट करून पाणी आणण्यासाठी नाहक त्रास सहन करत आहेत. येत्या दोन दिवसांत सदर गावातील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास वाळवंटी येथिल पाणीपुरवठा खात्यावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (Pissurlem Water Problem)

गावातील नागरिकांना दाबोस पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा होत आहे, त्यासाठी पाडेली येथे पाणी पुरवठा नियंत्रण योजना उभारण्यात आली आहे. परंतु, त्या ठिकाणाहून योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून गावातील सर्व नळ कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना सुमारे चार किलोमीटर अंतरावरून झरीचे पाणी आणून दिवस काढावे लागत आहे. यामुळे नागरिकांना पाणी आणण्यासाठी लहान मुलांचा सुद्धा वापर करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया प्रदिप गावडे यांनी व्यक्त केली आहे.

या भागातील पाणी पुरवठा दोन दिवसांत सुरळीत न झाल्यास या समस्येला कंटाळून नागरिकांनी वाळपई पाणी पुरवठा विभागावर घागर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, हे गाव राज्यातील इतर गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या म्हादई नदीच्या काठावर असून सुद्धा या गावातील नागरिकांना पाण्यासाठी असे हाल सहन करावे लागतात या कडे सरकारने तातडीने लक्ष देऊन उपाय योजना करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT