Pink Rickshaws in Panaji Dainik Gomantak
गोवा

राजधानी पणजीतही लवकरच पिंक रिक्षा

रोटरी क्लबच्या पुढाकाराने पणजी, मडगाव, म्हापसा आणि फोंडा या शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल

आदित्य जोशी

पणजी : काही दिवसापूर्वी म्हापसा येथे सुरू करण्यात आलेली पिंक ई-रिक्षा सेवा लवकरच राजधानी पणजीत सुरू होणार आहे. लवकरच पणजीकरांच्या सेवेत पिंक रिक्षा येणार अशी माहिती पणजी रोटरी क्लबचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी दिली आहे. (Pink Rickshaws in Panaji)

राज्‍यात महिलांसाठी पिंक ई-रिक्षा सेवा रोटरी क्लबच्या पुढाकाराने पणजी, मडगाव, म्हापसा आणि फोंडा या शहरांमध्ये सुरू केली जाईल. परंतु, काही कारणांमुळे या रिक्षा अजून आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही. येत्‍या आठवड्यात काही पोहोचतील आणि त्‍यानंतर पणजीत सेवा सुरू केली जाईल, असे धोंड यांनी सांगितले.

पिंक ई-रिक्षा सेवेसाठी महिला रिक्षाचालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. एकूण 20 ई-रिक्षा येणार आहेत. प्रत्येक शहरांमध्ये त्यांचे समान वाटप केले जाईल. एका वेळी ट्रकमध्ये आठ रिक्षा आणल्या जातात. परंतु, काही तांत्रिक कारणामुळे विलंब झाला आहे, असे धोंड यांनी सांगितले.

महिला, मुलांसाठी फायदेशीर
पिंक ई-रिक्षा सेवा ही महिला आणि लहान मुलांसाठी असेल. कुटुंब सोबत असल्यास पुरुषांना देखील त्यात बसता येईल. एका ई-रिक्षाची किंमत 3.20 लाख रुपये आहे. पणजीतील विविध ठिकाणी असलेल्या रिक्षा स्टँडवर एक पिंक ई-रिक्षा उभी असेल, असे धोंड यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT