Vedanta Mining Dispute Dainik Gomantak
गोवा

Pilgao Farmers Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा! डिचोलीतील ट्रकमालकांची मागणी; आंदोलनाची दिशा ठरणार?

Vedanta Mining Dispute: पिळगावमधील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची धग अजूनही कायम असून, शनिवारी सलग चौथ्या दिवशीही खनिज वाहतूक बंदच होती. दुसऱ्याबाजूने शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा, अशी मागणी डिचोलीतील ट्रकमालकांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pilgao Farmers Protest Vedanta Mining Dispute

डिचोली: शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही निर्णायक तोडगा निघत नसल्याने आंदोलन तीव्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलनाची पुढील कृती ठरविण्यासाठी रविवारी (ता.२४) शेतकरी आणि वंचित कामगारांची एक सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

पिळगावमधील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची धग अजूनही कायम असून, शनिवारी सलग चौथ्या दिवशीही खनिज वाहतूक बंदच होती. दुसऱ्याबाजूने शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा, अशी मागणी डिचोलीतील ट्रकमालकांनी केली आहे.

आंदोलनाची पुढील कृती ठरविण्यासाठी रविवारी सकाळी १० वा. आंदोलनस्थळी माठवाडा जंक्शनवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पिळगाव पंचायतीने ही बैठक बोलावली आहे, अशी माहिती मिळाली आहे. शेतकरी आणि कामगारांना पाठिंबा देण्यासाठी मये, मुळगाव आदी खाणपट्ट्यातील जनतेने या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ट्रकमालकांची तातडीची बैठक

‘रस्ता बंद’ आंदोलनामुळे बुधवारपासून सलग चार दिवस खनिज वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर धावले नाहीत. खनिज वाहतूक बंद असल्यामुळे डिचोलीतील ट्रकमालक अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वेदान्ता’ खाणीवर खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांची एक तातडीची बैठक आज सायंकाळी ‘एनएसपी’ प्लांटजवळ झाली. ‘वेदान्ता’ कंपनी व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या मागणीसंदर्भात ‘सुवर्णमध्य’ काढावा, अशी मागणी ट्रकमालकांनी केली आहे. तोपर्यंत खनिज वाहतूक करणारे ट्रक बंद ठेवण्याचा निर्णयही ट्रकमालकांनी घेतला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

...म्‍हणून उपसले आंदोलनाचे अस्‍त्र

खाण कंपनीने शेतकऱ्यांच्‍या मागण्‍यांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्‍यामुळेच शेतकऱ्यांना आता आंदोलनाचे शस्‍त्र उपसावे लागले आहे. कंपनी आमच्‍या मागण्‍या मान्‍य करत नाही, तोपर्यंत गप्‍प बसणार नाही, असा इशाराही दिला अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT