Pilerne Fire | Fire in Goa Paint Factory Dainik Gomantak
गोवा

Pilerne Fire: ‘बर्जर बेकर’ कंपनीवर गुन्हा नोंदवून 100 कोटी वसूल करा'

सरकारने या कंपनीवर गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून 100 कोटी रुपये वसूल करावेत, अशी मागणी रिव्होल्‍युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Fire in Goa Paint Factory: पिळर्ण औद्यागिक वसाहतीतील ‘बर्जर बेकर’ पेंट कंपनीला लागलेल्या आगीमुळे पर्यायवरणाला हानी पोहोचली आहे. संपूर्ण बार्देश तालुक्यावर याचा परिणाम झाला असून सुमारे दोन लाख नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा हा प्रकार आहे.

सरकारने या कंपनीवर गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून 100 कोटी रुपये वसूल करावेत, अशी मागणी रिव्होल्‍युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी केली.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत परब बोलत होते. यावेळी सांत-आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

या आग दुर्घटनेप्रकरणी ‘आरजी’ने काही खबरदारीच्या मागण्या करणारे निवेदन उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. परब म्‍हणाले की, बर्जर बेकर कंपनीला भीषण आग लागण्याचे प्रकरण गंभीर असून त्‍याची न्यायालयीन चौकशी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे. वायू गुणवत्ता तपासण्यासाठी समिती गठित करावी.

कंपनीकडून नुकसान भरपाई घेऊन प्रभावित नागरिकांच्या हितासाठी ती खर्च केली पाहिजे. पेंटची कंपनी धोकादायक असल्याने तेथे अग्निशमन यंत्रणा होती की नाही याची चौकशी होणे आवश्‍यक आहे. या सर्व प्रकारासाठी सरकार जबाबदार आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

आगामी विधानसभा अधिवेश्‍नात पिळर्ण औद्योगिक वसाहतीत लागलेल्या भीषण आगीबाबत लक्षवेधी सूचना मांडून शून्य तासात हा मुद्दा उपस्‍थित करणार आहे. दोषींवर कारवाई होणार की नाही हे बघावे लागेल. आज राज्यात हफ्ते देऊन बेकायदेशीर व्यवहार सुरू आहेत. हे असेच सुरूच राहिल्यास भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

- वीरेश बोरकर, ‘आरजी’चे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT