Goa: गोवा कार्निव्हलच्या निमित्ताने व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचे 'पिक्चर पोस्ट कार्ड' गोवा पोस्ट विभागाकडून जारी करण्यात आले आहे. त्यांचे गोव्याशी जुने नाते आहे. मिरांडा यांना त्यांच्या मरणोत्तर 2012 मध्ये भारत सरकारने पद्म विभूषण बहाल केले.
मिरांडा यांची व्यंग्यचित्रे द टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्ससह देशातील अनेक नामांकित वृत्तपत्रांमध्ये छापून आली आहेत. मिरांडा यांनी द टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यासोबत काम केले आहे.
सेवानिवृत्तीनंतर, मिरांडा यांनी गोव्यातील (Goa) लोटली येथील त्यांचा वडिलोपार्जित घरी राहणे पसंत केले. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात जाहिरात स्टुडिओमध्ये केली होती. पुढे द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियामध्ये त्यांना व्यंगचित्रकार म्हणून काम मिळाले. मिरांडा यांनी परत कधीच मागे वळून पाहिले नाही.
पुढे विविध देशात काम करून 1980 मध्ये ते भारतात (India) परतले. त्यांनी द टाईम्स ऑफ इंडिया येथे काम केले. निवृत्तीनंतरही, मिरांडा यांचे काम मुंबईच्या प्रकाशनांमध्ये नियमितपणे बघायला मिळत होते. त्यांना मॉरिशस आणि स्पेनसारख्या (Spain) देशांमध्ये प्रवास करण्यासाठी आणि त्यांच्या स्थानिक संस्कृतींचे चित्र काढण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. 11 डिसेंबर 2011 रोजी मिरांडाचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.