Physical relation demand for office work Officers in trouble in valpoi  Dainik Gomantak 
गोवा

कार्यालयीन कामासाठी शरीर सुखाची मागणी, वाळपईत अधिकारी अडचणीत

अधिकाऱ्यावर डिमोशनची कारवाई

दैनिक गोमन्तक

कार्यालयीन काम करून देण्यासाठी एका महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यावर डिमोशनची कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयातील आहे. यावर वाळपई (valpoi) उपजिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य कारकून अमित बाळेकरवर डिमोशनची कारवाई (Action) करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, गोव्यातील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. तर दुसरीकडे सरकारमधल्या मंत्र्यांवर अतिशय गंभीर असे आऱोप केले जात होते. त्यातच पुन्हा एका आमदाराने मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचं समोर आलं होतं. जागतिक तापमानवाढीशी संबंधित चळवळीच्या कार्यकर्त्या शमिता सृष्टी शर्मा यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

गोव्यातील एका आमदाराने मराठी अभिनेत्रीकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करत, मागच्या आठ महिन्यांपासून छळ केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी मुख्यमंत्री सावंत आणि आमदारावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT