Caranzalem petrol pump assault Case Dainik Gomantak
गोवा

Caranzalem: 'पुढच्या युनिटला पेट्रोल भरा', करंझाळे येथे IOCL पंप कामागाराला कार चालकाकडून मारहाण

याप्रकरणी पंप मालकाने कार चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Pramod Yadav

Caranzalem petrol pump assault Case: पेट्रोल पंपावरील एक युनिट काम करत नाही म्हणून, पुढच्या युनिटला पेट्रोल भरा. असे सांगितल्याने एका कारचालकाने पंपावरील कामगाराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आली. करंझाळे येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पंप मालकाने कार चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करंझाळे येथील इंडियन ऑईल (IOCL) पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पंप मालक गौरीष धोंड यांनी याप्रकरणी पणजी पोलिस ठाण्यात कार चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पंपावर घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये एका कारमधून कार चालक बाहेर येताना दिसत असून, बाहेर येताच तो पंप कामगाराला हाताने मारहाण करताना दिसत आहे. कारचालक कामगाराला मारहाण करत पुढे जाताना दिसत आहे.

मारहाण करणारा कार चालक स्थानिक होता की पर्यटक याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

मात्र, कार चालक पेट्रोल भरण्यासाठी थांबलेले युनिट कार्यरत नसल्याने पंपावरील कामगाराने त्याला पुढील युनिटवर इंधन भरण्यास सांगितले. दरम्यान, त्यामुळे राग आलेल्या कार चालकाने पंप कामगाराला मारहाण केली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: कोलवाळ हायवेवरील एचपी पेट्रोल पंपाजवळ एका बलेनो कारची दुचाकीला धडक

SCROLL FOR NEXT