Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पूलपार्टीमध्ये नशेचा द्रवपदार्थ देऊन पुण्यातील युवतीवर लैंगिक अत्याचार, धमकीचे फोन; संशयिताचा जामीन रद्द करण्याची मागणी

Anjuna Crime: पुण्यात इंटर्न करत असलेली १८ वर्षीय पीडित तरुणी आपल्या आईसोबत २१ जून २०२४ रोजी गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आली होती.

Sameer Panditrao

पणजी: हणजूण येथील एका कॅसिनो मालकाचा मुलगा असलेला बलात्कार प्रकरणातील संशयित सोहेल सय्यद याच्याविरुद्धचा गुन्हा गंभीर असताना त्याला पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेला सशर्त जामीन रद्द करण्यासाठी पुण्यातील पीडितेने मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका सादर केली आहे. त्यावरील सुनावणी येत्या ७ एप्रिलला ठेवली आहे.

पुण्यात इंटर्न करत असलेली १८ वर्षीय पीडित तरुणी आपल्या आईसोबत २१ जून २०२४ रोजी गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आली होती व ती मांद्रे येथील एका रिसॉर्टमध्ये थांबली होती. गोव्यात सांजावच्या दिवशी ती आपल्या मैत्रिणीसोबत एका हॉटेलात पूल पार्टीसाठी गेली होती.

या पार्टीत तिच्यासह मित्रमैत्रिणी मिळून सहाजण होते. त्यामध्ये संशयिताचाही समावेश होता. या पार्टीवेळी या सर्वांनी मद्यप्राशन केले होते. या मद्यामध्ये नशा येणारे द्रव्य मिसळून पीडितेला देण्यात आले. रात्रभर ही पार्टी सुरू असताना संशयिताने ती नशेमध्ये असल्याचा गैरफायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण केले होते.

तिच्या शरीरावर गंभीर जखमाही होत्या. त्यानंतर ती शुद्धीवर येऊन घरी परतल्यावर तिच्या आईने तिची अवस्था पाहून एका खासगी इस्पितळात दाखल केले असता तिचे लैंगिक शोषण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट केले. गोमेकॉ इस्पितळातही तिची तपासणी केली त्यामध्येही तोच अहवाल समोर आला. यासंदर्भातची तक्रार पीडित तरुणी व तिची आई हणजूण पोलिसांत देण्यास गेली असता संशयिताच्या वडिलांच्या हणजूण भागात असलेल्या वर्चस्वामुळे पोलिसांनी ती न घेता परत पाठवले होते.

पीडित तरुणीला धमकीवजा फोन

बलात्काराच्या घटनेनंतरच्या काळात पीडितेला पुण्याला गेल्यावर धमकीचे फोन येऊ लागले त्यामुळे तिची आई वकिलाला सोबत घेऊन पुन्हा ४ ऑक्टोबर २०२४ रोजी गोव्यात आली व हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस चक्रे वेगाने फिरली. त्यानंतर संशयित सोहेल सय्यद याला अटक झाली.

अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा गंभीर गुन्हा असतानाही संशयिताला सशर्त जामीन दिला. एका तरुणीला मद्यातून नशा पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासारखा गंभीर गुन्हा होऊनही तसेच कोठडीत असताना धमकीवजा फोन केल्याने न्यायालयाने दिलेला जामीन योग्य नाही, तो रद्द करण्यात यावा, अशी बाजू याचिकेत मांडण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT