Latambarse Bocholim Goa Dainik Gomantak
गोवा

Bicholim: रानटी डुक्करांना मारण्यासाठी ठेवलेला बॉम्बचा पाळीव कुत्र्याने घेतला चावा, स्फोटात कुत्र्याचा मृत्यू

डुक्करांना जीव घेण्यासाठी पेरलेला बॉम्ब चुकून पाळीव कुत्र्याने खाल्ल्याने ही घटना घडली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

Latambarse Bocholim Goa

रानटी डुक्करांना मारण्यासाठी ठेवलेला गावठी बॉम्बचा चावा घेतल्याने पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. डिचोलीतील लाटंबार्से येथे ही घटना उघडकीस आली आहे.

रानटी डुक्करांना मारण्यासाठी पेरलेला गावठी बॉम्ब चुकून पाळीव कुत्र्याने खाल्ल्याने ही घटना घडली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समोर आला असून, गावातील एका रस्त्यावर काही कुत्रे खेळताना दिसत आहेत. यात एका कुत्र्याने रस्त्या कडेला पेरलेल्या गावठी बॉम्बचा चावा घेतला, चाव घेताच क्षणी बॉम्बचा स्फोट झाला व कुत्र्याचा मृत्यू झाला.

गावठी बॉम्बचा स्फोट झाला तिथूनच जवळच्या अंतरावर लोकवस्ती असून, लहान मुले तिथे खेळताना दिसत आहेत. शिवाय काही नागरिकांची ये-जा देखील येथून होताना दिसतेय. दरम्यान, चुकून एकादा व्यक्ती अथवा लहान मुलाचा या बॉम्बसोबत संपर्क आला असता तर मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Pakistani Cosmetic Creams: तुम्हीही गोरेपणासाठी 'ही' क्रीम वापरताय का? 2 पाकिस्तानी सौंदर्य उत्पादनांवर मोठी कारवाई; भारतीय ग्राहकांची होतेय फसवणूक

SCROLL FOR NEXT