Bicholim MLA Dainik Gomantak
गोवा

Bicholim MLA: डिचोलीच्या आमदारांचा साळ पंचायतीने पाठिंबा का काढून घेतला, चंद्रकांत शेट्ये काय म्हणाले?

Bicholim MLA: आम्ही सरकारसोबत आहोत पण आमदारांसोबत नाही, असे सरपंच घाडी यावेळी म्हणाल्या.

Pramod Yadav

Bicholim MLA

साळ पंचायतीने डिचोलीचे अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये यांचा पाठिंबा काढून घेतल्याची माहिती सरपंच सावित्री घाडी यांनी दिली. तीन पंचायत सदस्यांसह मेघश्याम राऊत यांच्या उपस्थित घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

आम्ही सरकारसोबत आहोत पण आमदारांसोबत नाही, असे सरपंच घाडी यावेळी म्हणाल्या.

मागील दीड वर्षात आम्ही गावात विविध विकासकामे केली आहेत. पण, या दीड वर्षात विविध समस्यांचा देखील आम्हाला सामना करावा लागला आहे. आम्ही राज्य सरकारसोबत आहोत पण आमदारांना आमचा पाठिंबा नाही, असे सरपंच घाडी म्हणाल्या.

मुख्यमंत्री कार्यक्षम असून त्यांचे पूर्ण सहकार्य मिळत आहे. पण, काही विरोधकांमुळे आम्हील अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे राणे म्हणाल्या.

'गेल्या दोन वर्षापासून आमदार म्हणून मी सर्व पंचायतीची कामे केली आहेत. अशी एकही पंचायत नाही जिथे विकासकामाची अडवणूक केलीय. साळ पंचायतील अनेक विकास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत तर काही पूर्ण झालीयेत,' असे आमदार शेट्ये म्हणाले.

'आमदार म्हणून सर्व गावाला सोबत घेऊन काम करावे लागते, पण कधी कधी कोणाच्या काही समस्या असतात त्या त्यानांच गाव पातळीवर सोडवणे अपेक्षित असते. पण, ज्यांना मी सूडबुद्धीने वागतोय असे वाटते त्यांनी स्वत:चे परिक्षण करावे,' असे आमदार चंद्रकांत शेट्ये म्हणाले.

अशीही चर्चा!

अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये यांच्या विरोधात नरेंद्र सावळ, मेघश्याम राऊत आणि शिल्पा नाईक एकटल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. एका घरगुती कार्यक्रमात सर्वजण एकत्र आले होते. दरम्यान, साळ पंचायतीच्या पत्रकार परिषदेत मेघश्याम यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

Oracle Layoffs 2026: सकाळी 6 वाजता मेल आला अन् नोकरी गेली! ओरॅकलने पुन्हा दिला कर्मचाऱ्यांना नारळ; टेक कंपन्यांमध्ये चाललंय तरी काय?

Viral Video: ना धड इंग्रजी बोलता येईना, ना वाचता येईना! पाकिस्तानी आमदाराचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Pakistani Cosmetic Creams: तुम्हीही गोरेपणासाठी 'ही' क्रीम वापरताय का? 2 पाकिस्तानी सौंदर्य उत्पादनांवर मोठी कारवाई; भारतीय ग्राहकांची होतेय फसवणूक

SCROLL FOR NEXT