Mapusa Crime News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime News: लोकांचे पैसे अन् दागिने घेऊन फसवणूक करणारा म्हापसा पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी संशयिताला प्रतिबंधक कारवाईखाली अटक केली

Kavya Powar

Mapusa Crime News: लोकांची पैसे आणि दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या साहिल दळवी (कुडचडे) यास चोप देण्याचा प्रकार म्हापशात घडला. म्हापसा पोलिसांनी दळवी यास प्रतिबंधक कारवाई अंतर्गत अटक केली.

ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.१५च्या सुमारास म्हापसा कोर्ट जंक्शन परिसरात घडली. पैशांच्या व्यवहारातून संशयितासोबत काहीचा वाद झाला व प्रकरण हातघाईवर गेले. हा वाद होताच अजून काही लोक घटनास्थळी आले.

या लोकांना दागिने व रोख रक्कमेला गंडा घातला होता. सर्वांनी मिळून त्यास बराच चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व संशयिताला जमावाच्या तावडीतून सोडवून पोलीस स्थानकात आणले.

दरम्यान, पोलीस स्थानकात हे प्रकरण पोचताच संशयिताविरूद्ध तक्रार देण्यास कुणीच तयार झाला नाही. यामुळे पोलिसांनी शेवटी संशयिताला प्रतिबंधक कारवाईखाली अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT