Pernem Zoning Plan Dainik Gomantak
गोवा

Pernem Zoning Plan: पेडणे जमिन रूपांतर प्रकरणी शिवोली पूल अडविण्याचा इशारा; काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत, मंत्री राणे...

बैठकीला नागरिकांसह आमदार जीत आरोलकर उपस्थित; पूल अडविण्याचा इशारा

Akshay Nirmale

Pernem Zoning Plan: पेडणे तालुक्यातील 1.44 कोटी चौरस मीटर जमिनीच्या रूपांतरणावरून गोव्याचे नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर काँग्रेसने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज, गुरूवारी याबाबत झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या बैठकीला आमदार जीत आरोलकर देखील उपस्थित होते. यावेळी सरकार जर लोकांचे म्हणणे ऐकणार नसेल तर नागरिकांसह शिवोली पूल अडवून आंदोलन करू, असा इशारा या वेळी या बैठकीत देण्यात आला.

यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी, एक तर 17 डी हटवा नाहीतर लोकांच्या रोषाचा सामना करण्यास तयार राहा, असा इशारा सरकारला दिला.

दरम्यान, या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पेडणे झोनिंग प्लॅन हा मसुदा आहे. त्यावर लोकांच्या सूचना आणि हरकती येऊ शकतात. त्याचे स्वागतच आहे. नागरिकांना त्यांचे मत व्यक्त करू द्या. आम्ही नागरिकांना विश्वासात घेऊनच काम करू.

तर नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, पेडणे झोनिंग प्लॅन नागरिकाच्या हरकती आणि सूचनांसाठी खुला आहे. या सर्व हरकती, सूचनांचे तज्ज्ञांच्या समितीकडून दखल घेतली जाईल.

बुधवारीच काँग्रेस नेते अमित पाटकर यांनी विश्वजीत राणे हे 'रियल इस्टेट मंत्री' बनल्याची टीका करत गोव्यातील जमिनी बाहेरच्यांना विकण्याचा कट राणे यांनी आखला आहे, असे म्हटले होते. तसेच 3000 कोटी रूपयांच्या कमिशनसाठीच ते हे करत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT