Goa Congress | Pernem  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Goa Congress: दीपक कळंगुटकर म्हणाले की, तुये येथे कोट्यवधी रुपये खर्चून शंभर खाटांच्या इस्पितळाची इमारत २०१९ मध्ये बांधण्यात आली. पण अजूनही धूळ खात पडून आहे.तीन महिन्याने एकदा या इमारतीची दुरुस्ती करण्यात येते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress

‘भाजप सरकार हे सगळ्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले असून आगामी निवडणुकीत श्रीपाद नाईक यांना घरी बसवून अभ्यासू अशा ॲड. रमाकांत खलप यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन मांद्रे मतदारसंघातील ‘इंडिया’ आघाडीच्या घटकांनी पेडणे शेतकरी सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य बाबी बागकर , कॉंग्रेस गटाध्यक्ष नारायण रेडकर ,गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर ,‘आप’चे ॲड प्रसाद शहापुरकर , नामदेव तुळसकर ,मांद्रेचे माजी सरपंच ॲड अमित सावंत ,हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा उपस्थित होते.

दीपक कळंगुटकर म्हणाले की, तुये येथे कोट्यवधी रुपये खर्चून शंभर खाटांच्या इस्पितळाची इमारत २०१९ मध्ये बांधण्यात आली. पण अजूनही धूळ खात पडून आहे.तीन महिन्याने एकदा या इमारतीची दुरुस्ती करण्यात येते.

नाममात्र डायलिसिस करून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत आहे. ‘इलेक्ट्रॉनिक सिटी’ची स्थिती दयनीय झालेली आहे. या इलेक्ट्रॉनिक सिटी साठी नियोजन करण्यात आलेले पॉवर स्टेशन ची कार्यवाही नाही.वीज नाही तर व्यवसाय कसे येणार? राष्ट्रीय महा मार्गावर आवश्यक उपाययोजना न केल्याने हे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे बनलेले आहेत.

बाबी बागकर म्हणाले की , पंतप्रधान मोदी यांनी ‘अच्छे दिन आयेंगे’ अशी मोठी घोषणा केली होती. पण मांद्रे मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी लोकांना सरकारच्या अनेक जाचक कायद्यांमुळे जगणे कठीण झालेले आहे. म्हणूनच सर्वांनी रमाकांत खलप यांच्या पाठीशी रहावे.

स्थानिकांना रोजगार नाहीच!

मोपा विमानतळ व आयुष इस्पितळ या ठिकाणी नोकऱ्या मिळतील,अशा स्थानिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण या दोन्ही प्रकल्पात परप्रांतीयांनाच रोजगार मिळाला आहे.

तर ज्या काही स्थानिकांना रोजगार मिळाला त्यांची छळणूक होत आहे. याबाबत खासदार, मंत्री या नात्याने भाजप सरकार व श्रीपाद नाईक अपयशी ठरलेले आहेत. महागाई व सरकारची दादागिरी वाढली असून विरोधकांवर ‘ईडी’ वगैरे चा दुरुपयोग करण्यात येत आहे.

-ॲड. प्रसाद शहापूरकर

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपण पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघाचा पालकमंत्री असल्याचे जाहीर केले होते. पण या तालुक्याच्या त्यांनी येऊन केव्हा कसल्या समस्या जाणून घेतल्या व सोडवल्यात ते जाहीर करावे. भाजपने पेडणे तालुका संपवून टाकला आहे. उरलेला पेडणे वाचविण्यासाठी ‘इंडिया’चा उमेदवार येणे गरजेचे आहे.

-ॲड.अमित सावंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT