Pernem KTC Bus Stop Dainik Gomantak
गोवा

कदंबची बस आलीच नाही पेडणे बसस्थानकावर वयस्कर महिला अडकून पडली, अखेर मदतील पिंक फोर्स धावली

पेडणे बसस्थानकावर ही वयस्कर महिला बसची वाट पाहत थांबली होती.

Pramod Yadav

Pernem KTC Bus Stop: वाट पाहत असलेली बस वेळेत आलीच नाही त्यामुळे पेडणे बसस्थानकावर वयस्कर महिलेची गैरसोय झाली. रात्री साडे दहा वाजेपर्यंत ही महिला एकटीच बसस्थानकावर थांबली होती. अखेर काही स्थानिक नागरिक महिलेच्या मदतीला आले व त्यांनी गोवा पोलिसांची पिंक फोर्सची मदत घेतली.

झाले असे की, सावंतवाडीतून येणारी आणि पेडणे व म्हापसा मार्गे जाणारी कदंब बस सात वाजता पेडणे बस स्थानकावर येत असते. पण, शुक्रवारी रात्री ही बस आलीच नाही त्यामुळे वयस्कर महिलेची गैरसोय झाली.

पेडणे बसस्थानकावर ही वयस्कर महिला बसची वाट पाहत थांबली होती. महिलेला कोलवाळ येथे जायचे होते मात्र, बस वेळेत न आल्याने ती रात्री 10:30 पर्यंत त्याच ठिकाणी थांबली.

यावेळी स्थानिक नागरिकांनी महिलेची चौकशी केली. यावेळी महिलेने तिला कोलवाळ येथे जायचे असल्याचे सांगितले. स्थानिकांनी गोवा पोलिसांच्या पिंक फोर्स या महिलांसाठी विशेष सेवा असलेल्या विभागात फोन केला.

महिलेबाबत विभागाला माहिती देण्यात आली. पिंक फोर्सला माहिती मिळताच त्यांचे वाहन पेडणे बसस्थानकावर दाखल झाले आणि त्यांनी महिलेला सुखरूप घरी सोडले.

दरम्यान, कदंब बस ज्या महाराष्ट्रातील सावंतवाडीतून येत असतात त्यांच्या वेळापत्रकात नियमितता नसते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते शिवाय त्यांना वेळेवर बस मिळत नाही. अशी तक्रार स्थानिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT