indoor stadium rupees of 35 crore still not functioning Pernem  Dainik Gomantak
गोवा

पेडणे तालुक्यातील 35 कोटीचं 'इनडोअर स्टेडियम' अजूनही धूळ खात..

क्रीडाप्रेमींबरोबरच माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई यांची तीव्र नाराजी..

दैनिक गोमन्तक

मोरजी: राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या निमित्ताने का होईना, पेडणे तालुक्यात सर्वाधिक खर्च करून पेडणे (Pernem) सावळवाडा येथे 35 कोटी रुपये खर्च करून इनडोअर स्टेडियम (Indoor Stadium) क्रीडा मंत्री बाबू आजगावकर यांच्‍या प्रयत्‍नातून उभारला. मात्र, तो प्रकल्प आता लोकार्पणासाठी विलंब होत असल्याने क्रीडाप्रेमींबरोबरच माजी उपनगराध्यक्ष गजानन सावळ देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धांमुळे का होईना, हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. इनडोअर स्टेडियमला लागूनच फुटबॉल मैदान आहे. मैदानावर सध्‍या गवत वाढले आहे. तर इनडोअर स्टेडियमच्या लोखंडी सामानाला गंज आलेली आहे. ठिकठिकाणी कामे अर्धवट आहेत.

अन्‍य क्रीडांगणे रखडली : धारगळ येथे क्रीडामंत्री क्रीडानगरीच्या जागेत भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र गावातील क्रीडांगणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गावातील क्रीडा मैदानाची स्थिती बिकट आहे. तिथे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्याकडे लक्ष दिले जात नाही. मांद्रे, मोरजी, चोपडे आणि तुये या ठिकाणी मैदाने आहेत. मांद्रे येथील मैदानावर आजपर्यंत कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत.

क्रीडानगरीकडे सर्व लक्ष

तत्कालीन क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी काँग्रेस पक्षात असताना धारगळ येथे क्रीडानगरी उभारण्यासाठी 9 लाख चौरस मीटर जमीन संपादित केली होती. मात्र, राष्‍ट्रीय स्‍पर्धांमुळे गावागावातील क्रीडांगणांचा विकास करण्यास सरकारकडे पुरेसा वेळ नव्‍हता. क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी वेळोवेळी क्रीडानगरी ऐवजी सर्वप्रथम गावागावात मैदाने उभारून क्रीडाप्रेमींची सोय करावी अशी मागणी केली जात होती. तरीही सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहे.

राष्ट्रीय खेळासाठी राज्यात ठिकठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून मैदानांचा विकास, साधनसुविधा उपलब्ध केल्‍या आहेत. त्याचा एक भाग म्हणून पेडणे सावळवाडा येथे इनडोअर स्टेडियम उभारलेले आहे. प्रकल्‍पाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तांत्रिक समस्‍येमुळे उद्‍घाटन लांबणीवर पडले आहे.

क्रीडामंत्री -बाबू आजगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT