VIDEO Dainik Gomatnak
गोवा

VIDEO: छताचा तुकडा कोसळला, सरकारी कर्मचारी झाला जखमी; पेडणेतील घटना

Pernem Office Roof Collapse: पेडणे येथील सरकारी संकुलात असलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाच्या छताचा एक मोठा तुकडा पडल्याने सुजय गावडे हे कर्मचारी जखमी झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: पेडणे येथील सरकारी संकुलात असलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाच्या छताचा एक मोठा तुकडा पडल्याने सुजय गावडे हे कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. सरकारी संकुलाची ही इमारत जुनी झाल्यामुळे या इमारतीत असलेल्या अन्य कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांमध्येही आता भीती पसरली आहे.

या घटनेनंतर पेडण्याचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, संयुक्त मामलेदार प्रवीण गावस तसेच पेडणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंते सिद्धेश हुम्रसकर यांनी या कार्यालयाची पाहणी करून संबधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

तसेच जवळच्या मनुष्यबळ विकास कार्यालयालाही आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना नाईक यांनी केल्या आहेत. माहितीनुसार, २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पेडणे इमारत बांधकाम कार्यालयातर्फे आपल्या मुख्य कार्यालयाकडे या कार्यालयाच्या छताच्या दुरुस्तीसाठीचा सुमारे १२ लाख रुपयांचा आराखडा पाठवण्यात आला होता.

त्याची निविदा काढायची आहे. पण, त्यापूर्वीच अशाप्रकारे छताचा तुकडा खाली पडला. वेळीच दुरुस्ती केली असती तर आजची घटना घडली नसती.

१९९० मध्ये पायाभरणी

या संकुलाची पायाभरणी १९९० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते पेडण्याचे तत्कालीन आमदार शंकर साळगावकर यांच्या हस्ते झाली होती.

त्यानंतर काही वर्षे या संकुलाच्या छपरावर कौले किंवा पत्रेही घालण्यात आले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात छताला गळतीही लागली होती. त्यानंतर, काही वर्षांनी या इमारतीच्या छप्परावर कौलांचे छप्पर घालण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

India Economy: भारत होणार श्रीमंत अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्न पोचणार 4000 डॉलरपर्यंत; वाचा एसबीआय रिसर्चचा Report

Vande Mataram Cyclothon: 25 दिवसांत 6553 किमीची मोहीम! ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन’चा थरार; तारीख जाणून घ्या..

Goa Latest Updates: दुर्भाट, आडपई फेरीसेवेवर दाट धुक्यामुळे परिणाम

SCROLL FOR NEXT