पेडणे : मोपा विमानतळ परिसरातील उगवे, शमेचे आडवण-वारखंड आदी डोंगरावरील काजू बागायतीला आग लागून पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यात कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे.
उगवे येथील एक शेतकरी एकनाथ महाले यांच्या म्हणण्यानुसार, मोपा विमानतळ विमानतळ क्षेत्रात माकड, बिबटे, वाघ, गवे, रानडुक्कर, भेकरी यांसारखे रानटी प्राणी तसेच मोर, धनेश, घार आदींसारखे पक्षी विमानतळ परिसरात फिरू नयेत यासाठी विमानतळ क्षेत्राच्या बाहेर चार दिवसांपूर्वी वाळलेल्या गवताला आग लावली होती.
ही आग सर्वत्र पसरून सुमारे पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या काजू बागायती जळून खाक झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून रानात ही आग धुमसत आहे. एका आठवड्यापूर्वी अशाच प्रकारे लावण्यात आल्यामुळे चांदेल, कासारवर्णेत काजू बागायती जळून मोठी हानी झाली होती.
मोपा विमानतळाचे काम सुरू असताना पावसाळ्यात विमानतळ परिसरातील माती व लहान-मोठ्या दगडांच्या थराने उगवे व जवळच्या परिसरातील शेतीबागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. त्यातच आता आमच्या काजू बागायतींनाही आग लावून आमचे उदरनिर्वाहाचे साधनही नष्ट केले आहे. ‘मोपा’चे काम सुरू झाल्यापासून आम्हाला दरवर्षी अशा प्रकारे लाखो रुपयांचे नुकसानच सहन करावे लागत आहे.
एकनाथ महाले, शेतकरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.