pernem minor girl assault  Dainik Gomantak
गोवा

Pernem Crime: दलित मुलीला मारहाण, अश्लील शिवागाळ करुन विनयभंग केल्याप्रकरणी समीर कोरगावकरला महाराष्ट्रातून अटक

Minor Girl Assault Goa: संशयित आरोपी समीर कोरगावकर याला अटक करण्यात आली असल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी माध्यमांना दिली

Akshata Chhatre

पेडणे: उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात अल्पवयीन दलित मुलीला अश्लील शिवीगाळ, मारहाण करुन विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी समीर कोरगावकरला अखेर अटक करण्यात आली आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी शनिवारी (१९ एप्रिल) याबाबतची माहिती माध्यमांना दिली.

आंबेडकर जंयती दिवशी (१४ एप्रिल) पेडण्यातील खाजने येथे दुकानात जात असताना दलित मुलील शिवीगाळ करुन, मारहाण करत विनयभंग केल्याचा आरोप समीर कोरगावकर याच्यावर करण्यात आला. स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, पोलिसांनी संशयिताचा शोध सुरु केल्यानंतर संशयित आरोपीने पलायन केल्याचे उघडकीस आले. पोलीस त्याच्या मागावर असल्याची माहिती अक्षत कौशल यांनी दिली.

संशयित आरोपी समीर कोरगावकर याच्याविरोधात पिडीतेच्या पालकांकडून तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवायला टाळाटाळ केली असल्याचा आरोप पालकांनी केला होता. स्थानिक आणि पीडितेच्या पालकांनी पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने केल्यानंतर संशयिताच्या नावे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस जर का आरोपीला पकडण्यात असमर्थ असतील तर त्याला आम्ही शोधून देऊ असं म्हणत संतप्त जमावाने पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने करायला सुरुवात केली होती. पोलिसांचा डोळा चुकवून संशयित पसार झाला असला तरीही गोवा पोलिसांनी महाष्ट्रातील भेडशी या भागातून संशयित आरोपी समीर कोरगावकर याला शनिवार (दि.१९) अटक करण्यात यश मिळवलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session Live: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर!

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa News: ऐतिहासिक! 1972 पूर्वी अभयारण्यात आलेली, सर्व्हे आराखड्यावर नोंद असलेली एक लाख घरे कायदेशीर होणार, 1 ऑगस्टपासून प्रक्रिया

New Dress Code: हाफ-स्लीव्ह, लेगिंग्सला बंदी! भारताशेजारील 'या' देशात महिला-मुलींसाठी नवा ड्रेस कोड; तालिबानी फतवा जारी

Goa Murder Case: तलवारीने केला हल्ला, डिचोलीत पतीकडून पत्नीची हत्या

SCROLL FOR NEXT