Pernem Talathi shortage Dainik Gomantak
गोवा

Pernem: पंचायती 21, तलाठी आठच! पेडणे तालुक्याची व्यथा; ग्रामस्थांची होतेय गैरसोय

Pernem Talathi shortage: पेडणे तालुक्यात २१ ग्रामपंचायत कार्यालये आहेत आणि केवळ आठ तलाठ्यांवर या सर्व पंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे एका तलाठ्याकडे तीन-चार पंचायतींचा कार्यभार आहे.

Sameer Panditrao

Talathi shortage Goa News: मोरजी: पेडणे तालुक्यात एकूण २१ ग्रामपंचायत कार्यालय आहेत, तर केवळ आठ तलाठ्यांवर या २१ पंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे एकाही पंचायतीला सलग पाच दिवस तलाठी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची सरकारी कामांबाबत मोठी गैरसोय होत आहे.

पेडणे तालुक्यात २१ ग्रामपंचायत कार्यालये आहेत आणि केवळ आठ तलाठ्यांवर या सर्व पंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे एका तलाठ्याकडे तीन-चार पंचायतींचा कार्यभार आहे. त्यामुळे एकाही पंचायत कार्यालयातील ग्रामस्थांचे काम तलाठ्यांना करता येत नाही. शिवाय ग्रामस्थांचीही कामे मार्गी लागत नाहीत, अशा तक्रारी आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी लक्ष घालून तालुक्यातील सर्व २१ ही ग्रामपंचायतींना स्वतंत्र तलाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तसेच काही पंचमंडळी दरवेळी ही तक्रार पेडण्याच्या मामलेदारांकडे मांडतात; परंतु पेडणे तालुक्यासाठी केवळ आठच तलाठी नेमलेले असल्यामुळे मामलेदार कोणकोणत्या पंचायतीला नियमित तलाठी उपलब्ध करून देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांचे हेलपाटे

प्रत्येक पंचायत कार्यालयात कामाच्या निमित्ताने तलाठ्यांना ठरावीक दिवस दिलेले आहेत. सरकारी कामांसाठी ग्रामस्थ तलाठी कार्यालयात येतात; परंतु तलाठीच नसल्यामुळे त्यांची कामे होत नाहीत. त्यामुळे त्यांना आल्या पावली परतावे लागते. अनेकदा हेलपाटे मारल्यानंतर तलाठ्यांची भेट होते; परंतु त्यादिवशी ग्रामस्थांची गर्दी झालेली असते. त्यामुळे अनेकांची कामे रखडतात, अशी तक्रार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT