Corona Virus Dainik Gomantak
गोवा

गोमंतकीयांना ‘कोविड’ निधीचा ‘आधार’ मिळेना

लोकांत नाराजी : पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील 568 जण प्रतीक्षा यादीवर

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण व्यवहार बंद असल्याने राज्यातील विविध घटकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. यामध्ये रोजंदारीवर विविध क्षेत्रांत काम करणारे मजूर, वाहन चालक, मोटरसायकल पायलट, छोटे व्यावसायिक आदींचा समावेश होता. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून या काळात आर्थिक फटका बसलेल्या घटकांना एकरकमी मदत करण्याची योजना आखून पंचायतीच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. परंतु हे अर्ज पाठवून वर्ष होत आले तरी अद्याप कोणालाही मदत मिळालेली नाही.

पर्ये मतदारसंघातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील एका लाभार्थ्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शेकडो लाभार्थी या निधीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला. त्यामुळे बरेच लोक बेरोजगार झाले. काहींना व्यवसाय बंद करावे लागले. या काळात सरकारने स्वस्त धान्य दुकानांतून काही प्रमाणात मोफत धान्य पुरवठा केला. काही राजकीय नेत्यांनी व स्वयंसेवी संस्थांनी या काळात मदत केली. आर्थिक फटका बसलेल्या घटकांना सरकारने मदत करावी, अशी मागणी विविध माध्यमांतून केली जात होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची दखल घेऊन विविध घटकांना एकरकमी 5 हजार रुपयांची मदत करण्याची योजना आखून या योजनेचे अर्ज पंचायतीमार्फत समाज कल्याण खात्याकडे पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील सुमारे 568 जणांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायतीच्या माध्यमाद्वारे अर्ज भरून समाज कल्याण खात्याकडे पाठवले होते. या पंचायतीच्या वतीने एकूण पाच टप्प्यांत या योजनेचे अर्ज पाठवण्यात आले असल्याची माहिती पिसुर्ले पंचायत कार्यालयातून मिळाली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या कोविड आधार निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी येथील आर्थिक फटका बसलेल्या नागरिकांनी अर्ज सादर केले होते. त्यांची छाननी करून अर्ज समाज कल्याण खात्याकडे पाठवण्यात आले होते. परंतु अद्याप एकाही लाभार्थीला त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. हे अर्ज पंचायतीमार्फत पाठवण्यात आले असल्याने काही जण वारंवार विचारपूस करण्यासाठी पंचायतीत येत असतात. त्यामुळे सरकारने या अर्जांवर विचार करून लाभार्थ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT