Petrol  Dainik Gomantak
गोवा

इंधन आणि घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे सासष्टीवासी त्रस्त

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय युवा विंगचे उपाध्यक्ष सिद्धेश भगत यांनी देखील भाजपवर बोचरी टीका केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: इंधन व घरगुती गॅसच्या दरवाढीबाबत सासष्टी तालुक्यातील राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. इंधन दरवाढ करून भाजप सरकारने सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखी भर टाकल्याचा आरोप तालुक्यातील महिलांनी केला आहे.

इंधन व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या प्रश्नावरून लोकांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. केंद्रातील भाजप सरकारवर जनतेची लूट केल्याचा आरोपही अनेकांनी केला.

इंधन आणि गॅसच्या दरवाढीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, नवनिर्वाचित आमदार युरी आलेमाव म्हणाले की, "अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदार भाजप (BJP) सरकारने विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवून आपला लोकविरोधी अजेंडा पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे."

प्रमोद सावंत यांच्यावर देखील ते जोरदार कडाडले. "पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांच्या सोयीपेक्षा गोव्यातील लोकांची सोय महत्त्वाची आहे. गोव्याला ताबडतोब सरकार हवे आहे," आलेमाव म्हणाले.

आम आदमी पार्टीच्या (AAP) राष्ट्रीय युवा विंगचे उपाध्यक्ष सिद्धेश भगत यांनी देखील भाजपवर बोचरी टीका केली. ते म्हणाले," भाजपला लोकांनी निवडणून दिले. पक्ष आता याची अशा प्रकारे परतफेड करत आहे."

"लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी सरकार का समजू शकत नाही? कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आम्ही आधीच आर्थिक संकटांनी दबलेलो आहोत. वीज आणि पाण्याच्या दरात वाढ झाल्यामुळे आधीच आमचे जगणे कठीण झाले आहे आणि आता इंधन आणि एलपीजीच्या (LPG) दरात देखील वाढ होत आहे," लोकांनी आपला संताप व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT