पेडणे: पेडणे तालुक्याच्या आसपास असलेल्या सीमा भागांमधून बिगर गोमंतकीय मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी पेडणे ट्रॅक संघटनेने मंगळवारी (दि.२५ मार्च) पेडणे पोलिस स्थानकावर धडक दिली. या परप्रांतीय गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरे,रेती खडी व इतर सामान आणले जाते आणि यावर वेळीच कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केलीये.
पेडणे-बार्देश ट्रक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात गोव्याबाहेरून येणाऱ्या ट्रकांची संख्या वाढली आहे. हे ट्रक कुठल्याही वैध कागदपत्रांशिवाय गोव्यात व्यवहार करत आहेत, यावर खाण विभागाकडून वेळीच कारवाई केली गेली पाहिजे. आरटीओ विभागाजवळ अधिकृत नोंदणी न करता या गाड्यांची ये-जा सुरु आहे, पैकी काही ट्रकांना पकडून विभागाच्या हाती दिल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
कर्नाटक किंवा शेजारच्या राज्यातून आलेल्या लोकांकडून सुरु असलेल्या अशा अवैध व्यवसायांमुळे मूळ गोमंतकीयांच्या हाती काहीही राहिलेलं नाही, अशा गाड्यांवर कारवाई केली जावी म्हणून पोलीस स्थानकात जमल्याची माहिती त्यांनी दिली.
पेडणे तालुक्यातील ट्रक संघटनेकडून सुरु असलेल्या या आंदोलनात काही तरुणांचा देखील समावेश आहे. या तरुणांच्यामते ते स्वतःच्या पायावर उभे राहत काही तरी नवीन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र बाहेरून येणाऱ्या बिगर गोमंतकीयांमुळे त्यांच्या व्यवसायाचा खोळंबा होतोय.
सरकारने अशा बिगर गोमंतकीयांना काही प्रोजेट्स देण्यापेक्षा गोमंतकीयांना प्रोत्साहन द्यावे. ही लोकं इथे येऊन जेसीबी सारख्या गाड्यांची खरेदी करतात ज्यामुळे स्थानिकांचा व्यवसाय ठप्प झालाय.
आज टॅक्सी, मोपा विमानतळ म्हणा किंवा पर्यटन तसेच बाजार ठिकठिकाणी बिगर गोमंतकीयांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे गोमंतकीयांसाठी धोका निर्माण झालाय. आजच्या घडीला बूथ अध्यक्ष देखील बिगर गोमंतकीय आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात राजकारणात देखील त्यांचा सहभाग आढळून आला तर त्यात काही गैर वाटण्यासारखं नाही. अशा परिस्थितीत गोमंतकीयांनी काय करावं? आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य यामुळे धोक्यात असल्याने पाऊलं उचलत असल्याचं पेडणेकर सांगतायत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.