Pernem Municipality Construction Dainik Gomantak
गोवा

पेडणे पालिका प्रशासकीय इमारतीचे काम संशयास्पद!

काही भाग पाडणे सुरू : खुद्द कंत्राटदाराच्या अभियंत्यांकडून निकृष्ट दर्जाची कबुली

दैनिक गोमन्तक

मोरजी : पेडणे पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काही बांधकामाचा भाग तोडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या कामाबद्दल नागरिकांतून संशय व्यक्त केला जात आहे. पेडणे पालिकेची प्रशासकीय इमारत नऊ कोटी रुपये खर्च करून सुडा तर्फे उभारण्यात येत आहे.

या इमारतीचे बांधकाम सध्या संथ गतीने चालू आहे, या बांधकामाचा काही भाग सध्या तोडण्याचे काम सुरू असून ते काम निकृष्ट झाल्याचे खुद्द कंत्राटदाराचे अभियंते सांगतात.

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पालिका मंडळाच्या उपस्थितीत बांधकामाची पाहणी करून काम उत्कृष्ट दर्जाचे करावे,अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली होती. परंतु सध्या झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

या कामात सिमेंट हलक्या दर्जाचे वापरल्याचा संशय बांधकाम परिसरात पाहणी केल्यानंतर लक्षात येते. त्याचा भाग म्हणून काही बांधकामाचा भाग ज्या ठिकाणी लिफ्ट घालण्याचं काम सुरू होतं ते बांधकाम तोडण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. याविषयी संबंधित कंत्राटदारच्या साईट अभियंत्यांशी संपर्क साधला असता, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पाडण्यात येत आहे,असे सांगितले.

यासंदर्भात पेडणे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांच्याशी संपर्क साधून या इमारतीचे कशा पद्धतीने काम चालू आहे, याची पाहणी करावी, अशी विनंती केली. मात्र, आपण कामात मग्न असल्याचे सांगून त्यांनी दुर्लक्ष केले. शिवाय कार्यालयात संपर्क साधला असता ते कार्यालयातही नव्हते.

बांधकामाच्या ठिकाणी पर्यवेक्षक किंवा अभियंते नसतात. शिवाय बांधकामावर पाण्याची फवारणी केली जात नाही,असे दावा प्रकाश कांबळी यांनी केला आहे.

पालिका इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे कंत्राटदाराकडे तक्रार केली. त्यावर कंत्राटदाराने स्वतः बांधकाम पाडणे सुरू केल्याचे म्हटले आहे. पालिका आणि आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या इमारतीची पुन्हा एकदा पाहणी करून इमारतीच्या बांधकामाचा दर्जा तपासावा.

-महादेव गवंडी, रहिवाशी पेडणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT