Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case : पेडा - बाणावली खून प्रकरण; रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेहाजवळच दोघे संशयित बसले होते साडेचार तास

Goa Murder Case : थंड डोक्‍याने केली हत्‍या : विश्‍वनाथला दारू पाजून केले होते बेशुद्ध

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

Goa Murder Case :

मडगाव, पेडा-बाणावली येथील विश्‍वनाथ सिदनाळ खून प्रकरणात आता वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. विश्‍वनाथची पत्‍नी वैभवीने प्रियकर सूरज मुगेरी याच्‍या मदतीने अगदी थंड डोक्‍याने ही हत्‍या घडवून आणली.

विश्‍वनाथकडून प्रतिकार होऊ नये, यासाठी त्‍याला दारू पाजून बेहोश केले. संशयितांनी रात्री १२ वाजण्‍याच्‍या सुमारास त्याचा खून केला. मात्र, पहाटे ४.३० वाजेपर्यंत म्‍हणजे तब्‍बल साडेचार तास ते विश्‍वनाथच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहासोबतच त्या खोलीत बसून राहिले होते.

सूरज हा वैभवीचा प्रियकर असला, तरी त्‍याची विश्‍वनाथशी ओळख होती. शनिवारी (ता.२३ मार्च) विश्‍वनाथचा खून करण्‍याच्‍या इराद्यानेच सूरज गोव्‍यात आला होता. शनिवारी रात्री तो विश्‍वनाथच्‍याच खोलीवर राहिला.

त्‍या रात्री ते दोघेही बाहेर जाऊन दारू आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन आले. सूरजने विश्‍वनाथशी असलेल्‍या मैत्रीचा फायदा घेत त्‍याला बरीच दारू पाजली. मात्र, स्‍वत:ला जास्‍त नशा चढू नये, म्‍हणून त्‍याने बियर पिणे पसंत केले. प्रमाणाबाहेर दारू पिल्‍याने विश्‍वनाथची शुद्ध हरपली. रात्री १२ वाजण्‍याच्‍या सुमारास सूरजने खोलीतील

फावड्याने विश्‍वनाथच्‍या डाेक्‍यावर जोरदार प्रहार केल्याने तो तत्‍काळ गतप्राण झाला.

हा खून जरी रात्री १२ वाजण्‍याच्‍या सुमारास केला, तरी पहाटे ४.३० वाजेपर्यंत वैभवी आणि सूरज त्‍याच खोलीत होते. रविवारी पहाटे सूरज आधी खोलीतून बाहेर पडला. त्‍यानंतर काही वेळाने वैभवी झोपलेल्‍या मुलीला खांद्यावर घेऊन खोलीतून बाहेर पडताना दिसली.

खोलीच्‍या समोरील बाजूने सीसीटीव्‍ही कॅमेरे लावले आहेत, याची माहिती असल्‍याने त्‍यांनी मागच्‍या वाटेने जाणे पसंत केले; पण मागच्‍या बाजूलाही कॅमेेरे आहेत, याची जाणीव त्‍यांना नव्‍हती. याच कॅमेऱ्यात त्‍या सर्वांची छबी कैद झाली. वैभवी संशयितासोबत विश्‍वनाथच्‍याच मोटारसायकलवरून जाताना कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये दिसली. या फुटेजमुळेच त्‍यांचा बनाव करण्‍याचा प्‍लॅन फसला आणि ते आपसूकच पोलिसांच्‍या तावडीत सापडले.

दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न

रविवारी पतीचा खून करून प्रियकरासोबत खानापूरला पळून गेलेली वैभवी मंगळवारी सायंकाळी पुन्‍हा पेडा-बाणावली येथे आपल्‍या खोलीवर आली. यामागे लाेकांची दिशाभूल करण्‍याचा तिचा इरादा होता. पतीचा खून झाला, हे आपल्‍याला माहीतच नव्हते, असे दाखवायचा तिचा प्रयत्‍न होता. मात्र, घरातून पळून जाताना तिची छबी सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि सगळा बनाव उघडकीस आला.

पेंटींग कॉन्‍ट्रॅक्‍टच्‍या बहाण्‍याने विश्‍वनाथशी सलगी

सूरज मुगेरी हा व्‍यवसायाने पेंटर असून पेंटींग कॉन्‍ट्रॅक्‍ट असल्‍यास मिळवून द्या, असे सांगण्‍याच्‍या बहाण्‍याने तो विश्‍वनाथला भेटला, अशी माहिती पुढे आली आहे. खुनाच्‍या आदल्‍या रात्री तो विश्‍वनाथच्‍याच घरी झोपला.

रात्री खून केल्‍यानंतर तो आणि वैभवी विश्‍वनाथची मोटारसायकल घेऊन पळून गेले. सुरुवातीला त्‍यांनी रेल्‍वेने बेळगाव गाठण्‍याच्‍या इराद्याने त्‍याची मोटारसायकल घेऊन रेल्‍वे स्‍टेशनवर गेले. नंतर त्‍यांनी बेत बदलून मोटारसायकलवरूनच बेळगावला गेले. पोलिसांनी बेळगावातून ती मोटारसायकल जप्‍त केली.

अखेर तिने सत्य कबूल केले

मंगळवारी पोलिस खुनाचा तपास करीत असतानाच वैभवी पेडा-बाणावलीतील खोलीवर आली. पोलिसांनी त्‍यावेळीच तिला ताब्‍यात घेतले.

यावेळी ती म्हणाली, मी पतीशी वारंवार फोनवरून संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला; पण काहीच उत्तर येत नसल्‍यामुळे त्‍याच्‍या काळजीने मी परत घरी आले. मात्र, रविवारी पहाटे ती ज्‍याच्‍यासोबत घरातून बाहेर पडली तो कोण, असे विचारत पोलिसांनी तिच्‍यावर प्रश्‍नांचा भडिमार केला आणि शेवटी तिने सत्‍य कबूल केले.

इन्‍स्‍टाग्रामवर ‘ते’ पुन्‍हा भेटले

वैभवी आणि तिच्‍याच बरोबर शाळेत शिकणारा सूरज या दोघांचे प्रेम होते. मात्र, या प्रेमसंंबंधात जात आड आली. सूरजची जात वैभवीच्‍या जातीपेक्षा खालची असल्‍याने तिचे सूरजशी लग्‍न न करता विश्‍वनाथशी करण्‍यात आले.

मात्र, कालांतराने सूरज आणि वैभवी यांची इन्‍स्‍टाग्रामच्‍या माध्‍यमातून पुन्‍हा मैत्री झाली. त्‍यातूनच त्‍यांचे संंबंध पुन्हा जुळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT