यशवंत पाटील
भारतीय नागरिकांना अमेरिकेचे खूप आकर्षण आहे. तेथे खूप पैसा कमविता येईल, समृद्ध जीवन जगता येईल असे त्यांना वाटते. या हव्यासापोटी अनेकजण धडपड करून अमेरिकेत जातात, पण तेथे गेल्यावर त्यांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? जगण्यासाठी, अस्तित्वासाठी कसा संघर्ष करावा लागतो? हे ‘अमेरिकन वॉरियर्स’ या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
त्यामुळे समृद्ध जीवनशैली मिळवण्याच्या नादात आपला सुंदर भारत देश सोडून अमेरिकेत जाण्याच्या फंदात पडू नका. येथे काही कमी नाही. कोणत्याही क्षेत्रात चांगले करिअर करून जीवन समृद्ध करता येते, असे या सिनेमाच्या निर्मात्या रसाना शाह यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उद्या रविवारी २४ रोजी ‘अमेरिकन वॉरियर्स’ हा चित्रपट आयनॉक्समध्ये दाखविण्यात येणार आहे. रसाना शाह, क्रिस्टी कूर्स हे निर्माते आणि गुस्तावो मार्टिन यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात विशी अय्यर मुख्य अभिनेते असून त्यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून टेलर ट्रेडवेल यांनी उत्कृष्ट भूमिका सादर केली आहे.
चित्रपटाचे अभिनेते आणि लेखक विशी अय्यर म्हणाले, आपल्या जीवनातील सत्यकथेवर आधारीत फ्रिक्सन केलेली ‘अमेरिकन वॉरियर्स’ या चित्रपटाची कथा आहे. आयुष्यात आपल्याकडून काही चुका घडतात आणि आता आपले जीवन संपले, आपण यातून सावरू शकणार नाही असे अनेकांना वाटते, पण या व्यथेतून जिद्दीने सावरून पुन्हा आपल्या अस्तित्वाचा दिवा कसा प्रज्वलित करता येतो हे या चित्रपटात सांगितले गेले आहे.
आपल्या अंतःकरणातील प्रकाश प्रज्वलित करून जीवनातील अंधार दूर करता येऊ शकतो, हे सांगणारा हा चित्रपट अमेरिका आणि भारतीय सिने रसिकांना नक्की आवडेल, असे अभिनेत्री टेलर ट्रेडवेल यांनी सांगितले.
मी स्वतः एक शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अमेरिकेत गेलो, परंतु तेथे दारूच्या आहारी गेल्याने व्यवसायात पूर्ण बुडालो. पण २० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्यातून बाहेर पडून पुन्हा उभा राहिलो. अमेरिकेत इंडियन हिरो म्हणून नाव कमवण्याचे ध्येय मनाशी बाळगले आणि ते मी साकार केले. याच कथेची कास धरून माझ्या जीवनातील सत्य कथा फ्रिक्सनद्वारे या चित्रपटात मांडायचा प्रयत्न केला आहे, असे चित्रपटाचे अभिनेते आणि लेखक विशी अय्यर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.