Murder Case Dainik Gomantak
गोवा

Crime News: सहा वर्षांच्‍या मुलीची साक्ष ग्राह्य; पतीच्या खूनप्रकरणी पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला

Peda Banavali Murder Case: पेडा-बाणावली येथे विश्वनाथ सिदनाळ (३५) यांच्या खूनप्रकरणी त्यांची पत्नी मंगला ऊर्फ वैभवी सिदनाळ हिचा जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी हा निवाडा दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: पेडा-बाणावली येथे विश्वनाथ सिदनाळ (३५) यांच्या खूनप्रकरणी त्यांची पत्नी मंगला ऊर्फ वैभवी सिदनाळ हिचा जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांनी हा निवाडा दिला. २०२४ मध्ये ही खुनाची घटना घडली होती. या प्रकरणात सिदनाळ दाम्‍पत्‍याची सहा वर्षांची मुलगी मुख्य साक्षीदार आहे.

मुलीने न्यायालयात दिलेल्या जबाबात तिची आई मंगला आणि संशयित सूरज मायगिरी यांनी मिळून वडिलांच्या डोक्यावर तसेच शरीराच्या अन्य भागांवर फावड्याने वार केल्याचे सांगितले. हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचेही तिने जबानीत सांगितले. मंगला ऊर्फ वैभवी हिच्या वतीने युक्तिवाद करताना तिच्या वकिलांनी तिला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आल्याचा दावा केला.

तसेच तिचे संशयित सूरज मायगिरी याच्याशी कोणतेही विवाहबाह्य संबंध नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. गुन्ह्यानंतर संशयितांनी राज्याची सीमा ओलांडून पलायन केल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगला हिला जामीन दिल्यास ती पुन्हा फरार होण्याची किंवा न्यायप्रक्रियेत अडथळा आणण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत, खटला प्रदीर्घ काळ चालण्याची शक्यता असली तरी केवळ त्या कारणावरून मृत्यू किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील संशयिताला जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

पुरावे नष्‍ट करून बेळगावला पलायन

न्यायालयाने नमूद केले की, हल्ल्यानंतर मंगला आणि सूरज मायगिरी या दोन्ही संशयितांनी पुरावे नष्ट करण्याच्या तसेच कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्याच्या उद्देशाने मृत विश्वनाथ यांच्‍या स्कूटरवरून अल्पवयीन मुलीसह बेळगावला पलायन केले होते. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल तसेच गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT