Goa Ravindra Bhavan Dainik Gomantak
गोवा

मडगाव रवींद्र भवनच्या दुरवस्थेकडे लक्ष द्या : कलाकारांची मागणी

सरकारने सोयी-सुविधा पुरवाव्यात

दैनिक गोमन्तक

सासष्टी : रवींद्र भवन हे मडगाव व परीसरातील कलाकार, नाट्य व संगीत प्रेमींसाठी सांस्कृतिक केंद्र आहे. रवींद्र भवनमध्ये अनेक दर्जेदार कार्यक्रम, नाटके, संगीत मेळावे, प्रदर्शने आयोजित केली जातात. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून रवींद्र भवनवर प्रसासकीय समिती नाही, त्यामुळे तिच्या दुरुस्ती किंवा कार्यक्रम नियोजनाकडे दुर्लक्ष होत आहे. रवींद्र भवनच्या बांधकामातही घोळ झाला आहे. सद्यःस्थितीत रवींद्र भवनची दुरवस्था झाली असून, सरकारने सोयी-सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कलाकारांनी केली आहे.

रवींद्र भवनमध्ये दररोज एखादा तरी कार्यक्रम असतोच. तियात्र ही नित्याचीच बाब असते. त्यासाठी शेकडो लोकांचे येणे-जाणे येथे असते. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून येथील कॅन्टीन व्यवस्था बंद आहे. त्यामुळे लोकांची कुचंबणा होत आहे. मुख्य सभागृहातील आवाज यंत्रणाही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तियात्र किंवा इतर कार्यक्रमांसाठी आयोजकांना भाड्याच्या आवाज व्यवस्थेची सोय करावी लागते.

इमारतींना पडल्या भेगा

रवींद्र भवनमधील ब्लॅक बॉक्सची संपूर्ण दुरुस्ती होणे आवश्यक आहे. इमारतीच्या भिंतीना भेगा पडलेल्या आहेत. पार्किंगसाठी जागा असलेल्या ठिकाणचेही पेव्हर्स फुटलेले आहेत. उपहारगृह (कॅन्टीन) व्यवस्था नसल्याने लोकांचे हाल होत आहेत, असे तियात्रीस्ट पास्कोल द चिखली यांनी सांगितले.

शौचालयाची बकाल अवस्था

रवींद्र भवनमध्ये असलेल्या शौचालयाची बकाल अवस्था झाली आहे. दैनंदिन शौचालय स्वच्छ केले जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शौचालयात पाणी येत नसून, काही नळ नादुरुस्त अवस्थेत आहेत. लोकांच्या मूलभूत गरजा भागत नसल्याने ते रवींद्र भवनमध्ये येण्यास कुणी धजत नसल्याचे विन्सेंत डिसिल्वा यांनी सांगितले.

रवींद्र भवनच्या काही भागाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. दुरुस्ती कामाबाबतची एक यादी सरकारकडे पाठवली आहे. काही दुरुस्त्या करण्यास आपण पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरवात होईल.

- आग्नेल फर्नांडिस, सदस्य सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT